अमृतवाहिनी बँकेचा भारतरत्न सहकारीता पुरस्काराने सन्मान तीन पुरस्कारांसह देश पातळीवर सन्मान
अमृतवाहिनी बँकेचा भारतरत्न सहकारीता पुरस्काराने सन्मान तीन पुरस्कारांसह देश पातळीवर सन्मान
Sangmner vijay kapse दि ८ जुन २०२६-–काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून या बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल भारतरत्न सहकारीता पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले असून देश पातळीवरील विविध तीन पुरस्काराही मिळाले आहेत.जाहिरात
उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे संपन्न झालेल्या भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट 2026 मध्ये सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेला भारतरत्न सहकारीता सन्मान हा पुरस्कार देण्यात आला. तर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना बेस्ट चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना बेस्ट सीईओ , व शून्य एनपीए बद्दल बेस्ट एनपीए मॅनेजमेंट चा पुरस्कार देण्यात आला. हे पुरस्कार आसाम राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व विद्यमान आमदार श्री विश्वजीत फुकण, भारत नेटवर्क ग्रुपचे श्री अनुपम गुप्ता आणि श्री आशिष श्रीवास्तव यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती, असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय जाधव यांनी स्वीकारले.जाहिरात
सहकारीता हा महाराष्ट्राच्या विकासाचा पाया असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा अमृत उद्योग समूह व विविध सहकारी संस्था कार्यरत आहेत. संगमनेरच्या सहकाराने देशाला कायम दिशा दिली असून अमृतवाहिनी बँकेचा हा देश पातळीवर सन्मान संगमनेरचा सन्मान वाढवणारा आहे.
जाहिरात
लखनऊ येथे झालेल्या भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिटमध्ये अमृतवाहिनी बँकेच्या उत्कृष्ट कामकाज, गुणवत्ता, बेस्ट व्यवस्थापन, डिजिटल प्रणाली, अचूक कामकाज ,तत्पर सेवा, शून्य टक्के नेट एनपीए व 1200 कोटींची उलाढाल या सर्व बाबींचा विचार करून बँकेला यावर्षीच्या भारतरत्न सहकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जाहिरात
तर बँकेच्या कामकाजामध्ये अत्यंत नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणारे आणि युनियन बँकेचे निवृत्त अधिकारी व राज्य पातळीवर नेतृत्व केलेले बँकेचे विद्यमान चेअरमन सुधाकर जोशी यांनी आपल्या कार्यकाळात बँकेत राबवलेल्या विविध आधुनिक प्रणाली, अचूकता गुणवत्ता व कर्मचाऱ्यांचे सांघिक नियोजन करत बँकेच्या कामाची गुणवत्ता वाढवण्याबद्दल सुधाकर जोशी यांना बेस्ट चेअरमन म्हणून सन्मानित करण्यात आले.
बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद ,ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी यांना बेस्ट सीईओ म्हणून गौरविण्यात आले तर बँकेने मागील आर्थिक वर्षात नेट एन पी ए चे प्रमाण शून्य टक्के राखल्याबद्दल एनपीए मॅनेजमेंटचे अवॉर्ड बँकेला देण्यात आले.
या पुरस्कारानंतर चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की हा पुरस्कार सांघिक कामाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कामकाजाची गुणवत्ता कायम ठेवून नागरिकांमध्ये मोठा विश्वास निर्माण केला आहे. या पुरस्काराने मोठे बळ मिळाले असून यापुढेही आणखी चांगले काम करण्यास ऊर्जा मिळेल असे ते म्हणाले.
बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल चेअरमन , व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ व बँकेचे अधिकारी यांचे बँकेचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, बाबा ओहोळ, संपतराव डोंगरे, राजेश मालपाणी, इंद्रजीत भाऊ थोरात, नगराध्यक्ष सौ.डॉ मैथिलीताई तांबे,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, के के थोरात, बापूसाहेब टाक, अजय फटांगरे ,सोमेश्वर दिवटे, यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.