आपला जिल्हा

पुस्तक आपल्या दारी उपक्रमाने विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी जागवली

पुस्तक आपल्या दारी उपक्रमाने विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी जागवली
पुस्तक आपल्या दारी उपक्रमाने विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी जागवली
संगमनेर विजय कापसे दि ३ ऑगस्ट २०२५भाऊसाहेब संतुजी थोरात प्राथमिक विद्यामंदिर कनोली येथे आज “पुस्तक आपल्या दारी” हा अभिनव वाचन प्रोत्साहन उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. श्रीमती पुष्पा निऱ्हाळी यांनी स्वतःच्या संग्रहातील १५० पुस्तके विद्यार्थ्यांसाठी आणून वाचनासाठी उपलब्ध करून दिली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून ” मी काय वाचलं ?” यावर मनोगत सादर करत वाचनातील गोडी आणि आकलन व्यक्त केलं.
या कार्यक्रमास स्कूल कमिटीचे अध्यक्ष सिताराम वर्पे, प्राचार्य गायकवाड, मुख्याध्यापक कोटकर सर,  नम्रता पवार, तांबे मॅडम, गायकवाड मॅडम, बाबासाहेब वर्पे हे उपस्थित होते.

यावेळी पुष्पा निराळी म्हणाल्या की, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो वाचेल तोच टिकेल. सोशल मीडिया हे फास्टफूड आहे. यामुळे अपचन होते आहे. वाचन ही संस्कृती प्रत्येकासाठी अत्यंत गरजेची आहे. विद्यार्थ्यांनी वाचावे याकरता पालकांनी पुढाकार घ्यावा. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री संस्थेमध्ये वाचन चळवळ वाढवण्यासाठी सातत्याने काम केले जात असून मैदानी खेळ हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध बालगीते सादर केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढीस लागून ज्ञानार्जनाचा नवीन मार्ग खुला झाला आहे. अशा उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि सांस्कृतिक संवेदनशीलता अधिक समृद्ध होत आहे. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राहींज यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे