आल्याच्या पिकांतून शेतकरी लखपती; ३० गुंठ्यांत मिळवले २८० क्विंटल उत्पादन
प्रति क्विंटल ४ हजार रुपये भाव मिळवत झाले लखपती

कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑगस्ट २०२५– कृषिप्रधान भारत हा देश मसाल्याचा देश म्हणून जगात ओळखला जातो यात प्रामुख्याने जिरे, मोहरी, दालचिनी, लवंग, मिरची,आले, हळद, वेलदोडे आदि महत्त्वाच्या मसाल्याच्या पिकांचा समावेश होतो. यात आले हे या पिकाला महत्त्वाचे स्थान असून भारतात मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी आल्याचा वापर केला जात असल्याने दिवसेंदिवस सर्वच भागांमध्ये आल्याची लागवड वाढत असून अनेक शेतकरी यातून सदन होताना दिसून येत आहे. असेच एक उदाहरण कोपरगाव तालुक्यातील एका युवा शेतकऱ्यांनी ३० गुंठ्यात तब्बल २८० क्विंटल आल्याचे उत्पादन मिळवले आहे.

कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील मनोज रामनाथ गोणटे हे गेली अनेक वर्षापासून वडिलोपार्जित शेतात पारंपरिक पिकांची लागवड करत शेती करत होते परंतु यावर्षी रोटेगाव येथील बालाजी कृषी सेवा केंद्राचे वाल्मीक कुहिले, जीएस ऍग्रो चे गणेश साळुंखे, गोकुळ गोरे, सतीश ढवळे, राहुल मोगरे, भाऊसाहेब मोगरे, संदीप ढवळे, जाधव ऍग्रो कोपरगाव चे मयूर कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ओगदी येथील ३० गुंठे शेतात माहीम या जातीच्या आल्याची लागवड केली यासाठी त्यांनी शेणखत, बेसल डोस, जैविक औषधाच्या फवारण्या आदींचा वापर करत आल्याची उत्कृष्टपणे लागवड रोपण केले.

शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करता- करता आधुनिकतेची कास धरत मसाला पिकांची लागवड केली तर शेतकरी यातून नकीच सदन होऊ शकतो.मनोज गोणटेप्रगतशील आल्याचे शेतकरी




