आपला जिल्हा

रेणुका कोल्हे यांनी आद्रक उत्पादक युवा शेतकऱ्याचे  केले अभिनंदन

रेणुका कोल्हे यांनी आद्रक उत्पादक युवा शेतकऱ्याचे  केले अभिनंदन

रेणुका कोल्हे यांनी आद्रक उत्पादक युवा शेतकऱ्याचे  केले अभिनंदन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ सप्टेंबर २०२५भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात अनेक प्रकारचे शेती पिके मोठ्या प्रमाणात घेत असतात यात आद्रक या मासाला पिकाला देखील अत्यंत महत्त्व असून सध्या बहुतांश भागात शेतकरी या पिकाकडे वळालेले दिसून येतात.कोपरगाव तालुक्यात देखील एका युवा  शेतकऱ्यांने आपल्या शेतात आद्रक या पिकाची लागवड करत भरघोस उत्पन्न  मिळवल्याबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील मनोज रामनाथ गोणटे या युवा शेतकऱ्यांने मित्र परिवाराच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतात ३० गुंठे आद्रक या मसाला पिकाची लागवड करत २८० क्विंटल उत्पन्न मिळवत लखपती झालेल्या या युवा शेतकऱ्याला नुकताच संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा तसेच संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका विवेक कोल्हे यांनी सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून आद्रक या मसाला पिका विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली.

जाहिरात
याप्रसंगी ओगदी येथील ज्येष्ठ नेते तानाजी चरमळ, रघुनाथ जोरावर, करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण, ओगदी गावचे उपसरपंच सोमनाथ जोरवर, ओगदी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रवींद्र पोळ, आण्णा जोरवर, देवराम रुपनर, जगन जोरवर, राहुल कोल्हे, राजाराम गोणटे, पारसनाथ गोणटे, अशोक गोणटे, सुभाष डिके,सागर भालेराव, संदिप ढवळे, भाऊसाहेब मोगरे, अर्जुन जोरावर, गणेश जोरवर आदी सह ओगदी गावचे ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या प्रसंगी रेणुका कोल्हे यांनी आद्रक उत्पादक शेतकरी मनोज गोणटे व त्यांच्या संपूर्ण परिवाराचा सत्कार करत अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे