आपला जिल्हा

बाजार समितीने दुष्काळात नफ्यातून मदत उपक्रम राबवा,सर्वांनी मिळून धान्य बँक सुरू करावी : बिपीनदादा कोल्हे

बाजार समितीने दुष्काळात नफ्यातून मदत उपक्रम राबवा,सर्वांनी मिळून धान्य बँक सुरू करावी : बिपीनदादा कोल्हे
कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० सप्टेंबर २०२६–कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेली सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक वर्षातील कामकाजाची माहिती सभापती साहेबराव रोहोम यांनी दिली.यावेळी बोलताना बिपीनदादा कोल्हे म्हणाले १९७२ प्रमाणे दुष्काळाच्या झळा बसण्याची परिस्थिती आहे.त्यावेळी स्व.कोल्हे साहेब यांनी केलेल्या उपयोजना व दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन महत्वाचा आधार कोरडवाहू भागात झाला.कोपरगाव तालुक्यात खरिपाची कमी पण रब्बीची अधिक गावे आहे.दोन वेळा लँड सीलिंग ऍक्ट आला त्यामुळे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायती भाग असल्याने त्यात जमिनी कमी झाल्या.त्यावेळी १८ एकर जमीन होती पण आज चार पिढ्यानंतर तोच शेतकरी अल्पभूधारक झाला आहे.पर्यायाने बांधावरून वाद सुरू झाले. न्यायायलीन लढाईत वेळ जातो पैसा खर्च होतो यामुळे नवीन पिढीला आपण काय देणार आहोत हा प्रश्न आहे.नानासाहेब चांदगुडे यांना सांगून राहता बाजार समितीची जागा स्व.शंकरराव कोल्हे यांनी खरेदी करण्यास सांगितले होते.नगर मनमाड मार्गावर उभे राहणारे वाहने आणि चाऱ्याचा लिलाव यामुळे तिथे अपघात होतात याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला त्यावर कोल्हे यांनी सकारात्मक भाष्य केले.

जाहिरात
महाराष्ट्रात दुष्काळाला सामोरे जाताना पहिली बाजार समिती म्हणून कोपरगाव बाजार समितीने नफ्यातील पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून बी बियाणे, दुग्ध व्यवसायाला हातभार असे काही उपक्रम राबवले पाहिजे.ज्यांची क्षमता आहे त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन धान्य बँक सुरू करण्याची गरज आहे त्यासाठी आपण मानसिकता ठेवत सक्षम शेतकऱ्यांची मदत घेऊन धान्य बँक सुरू करावी अशी सूचना केली. शेतकरी टिकला तर देश टिकेल.दुष्काळ संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या शहरांनी पुढे यावे कारण वर्षभर शेतकरी तुम्हाला साथ देतो त्याला आता साथ द्या.बाजार समितीने उत्कृष्ट काम केले आहे त्यांनी अधिक सक्षमपणे काम करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
यावेळी ऐनवेळच्या विषयात प्रगतशील शेतकरी बबनराव निकम यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नाव देण्याचा ठराव मांडला.यासह नव्याने होणाऱ्या शेतकरी भवनाला देखील स्व.शंकरराव कोल्हे शेतकरी भवन नाव देण्याची मागणी केली याला पांडुरंग शिंदे,संदीप देवकर,विक्रम पाचोरे, दीपक चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या वतीने अनुमोदन दिले.
जलयुक्त शिवार योजना चाळीस वर्षांपुर्वी कोपरगाव तालुक्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी राबवली होती.दुष्काळाची झळ कमी होण्यासाठी आपल्याकडे बंधारे उपलब्ध आहेत त्यासाठी आमदार विवेक कोल्हे यांनी बंधारे दुरुस्तीसाठी ७ कोटी २९ लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे याबद्दल शेतकऱ्यांनी आभार मानले.
बाजार समितीचे सर्व संचालक,कोल्हे कारखाना व्हा.चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, कोपरगाव औद्योगिक वसाहताचे व्हा.चेअरमन केशवराव भवर,कोल्हे कारखाना सर्व संचालक,आजी माजी नगरसेवक,शेतकरी,व्यापारी, विविध बाबतीत योगदान दिलेले सत्कारमूर्ती यावेळी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे