आपला जिल्हा

सभापती प्रा.राम शिंदे व पालकमंत्री डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान

सभापती प्रा.राम शिंदे व पालकमंत्री डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान
सभापती प्रा.राम शिंदे व पालकमंत्री डॉ विखे पाटील यांच्या उपस्थितीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान
जाहिरात

Ahilyanagar vijay kapse दि ६ ऑगस्ट २०२६ : अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचविण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य – व्यसनमुक्त जिल्ह्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत शहरातून भव्य व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली असून विविध शाळा, महाविद्यालये, युवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

जाहिरात

या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. आजचा तरुण हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असून अंमली पदार्थांच्या आहारी न जाता शिक्षण, करिअर आणि समाजकार्यात स्वतःला घडविण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व्यसनमुक्ती जनजागृतीला गती दिली जात असल्याचे सांगितले. अंमली पदार्थांचे सेवन व्यक्ती, कुटुंब आणि समाजासाठी घातक असून तरुणांनी शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, कला, उद्योग आणि समाजसेवा यांसारख्या सकारात्मक क्षेत्रांमध्ये स्वतःला घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत या अभियानामुळे नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार काशिनाथ दाते यांनी व्यसन ही समाजाला लागलेली किड असून तरुणांनी निश्चित ध्येय ठेवून त्या दिशेने वाटचाल करावी, असे सांगितले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तरुणांनी समाजमाध्यमांचा उपयोग सकारात्मक विकासासाठी करावा तसेच अंमली पदार्थांविरोधातील माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या रॅलीने शहरात जनजागृतीचे प्रभावी वातावरण निर्माण केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे