आपला जिल्हा

के.बी.पी विद्यालयात महात्मा फुले व शाहू महाराजांचे पुतळे उभारावे-ॲड. संदीप वर्पे

के.बी.पी विद्यालयात महात्मा फुले व शाहू महाराजांचे पुतळे उभारावे-ॲड. संदीप वर्पे

के.बी.पी विद्यालयात महात्मा फुले व शाहू महाराजांचे पुतळे उभारावे-ॲड. संदीप वर्पे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ मे २०२५शेकडो वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज यांनी स्त्री शिक्षण, शोषित, पीडित यांच्या साठी शिक्षणाची सुरुवात केली.त्यांच्या पासूनच प्रेरणा घेत कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणाचे माध्यम उपलब्ध करून दिले असून अशा या थोर महापुरुषांचे पुतळे कोपरगाव येथील के.बी.पी शाळेत उभारावे अशी मागणी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲड. संदीप वर्पे यांनी केली आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात असलेल्या भव्य दिव्य अशा स्वर्गीय कर्मवीर आण्णांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण होणार असून त्या सोबतच महाराष्ट्रातील सर्व समजघटकाना शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळे स्थापित केल्यास भावी पिढीस त्यांचे कार्य स्मरणात राहून प्रेरणा देतील अशी भावना ॲड. वर्पे यांनी व्यक्त करत या दोन्ही राष्ट्र पुरुषांचे पुतळे उभारावे अशी मागणी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये ॲड. वर्पे यांनी केली.

जाहिरात

या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन ऍड. भगीरथ काका शिंदे, सर्व मॅनेजिंग कौन्सील सदस्य, जनरल बॉडी सदस्य उपस्थित होते.

ॲड.संदीप वर्पे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे