विखे-पाटील

खोटी आश्‍वासनं देवून विखे पाटील परिवाराला बदनाम करणा-यांचे चेहरे उघडे पडले- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील 

खोटी आश्‍वासनं देवून विखे पाटील परिवाराला बदनाम करणा-यांचे चेहरे उघडे पडले- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

खोटी आश्‍वासनं देवून विखे पाटील परिवाराला बदनाम करणा-यांचे चेहरे उघडे पडले- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील 

जाहिरात

आश्वी विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४निळवंडेचा पाणी प्रश्‍न हा केवळ महायुती सरकारमुळेच सुटू शकला. जिरातील भागातील अनेक वर्षाचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करता आले याचे समाधान आहे. यापुर्वी फक्‍त खोटी आश्‍वासनं देवून विखे पाटील परिवाराला बदनाम करणा-यांचे चेहरे उघडे पडले. २०२४ पर्यंत पाणी मिळवून देणार या दिलेल्‍या शब्‍दाची वचनपुर्ती केली असल्‍याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

जाहिरात

       खडकेवाके, आडगाव या ठिकाणी महायुतीच्‍या प्रचाराच्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या सभेमध्‍ये मतदारांशी संवाद साधून महायुतीने घेतलेल्‍या  निर्णयांची मा‍हीती दिली. यापुर्वी सत्‍तेवर असलेल्‍या आघाडी सरकारने राज्‍याला वा-यावर सोडून दिले होते. महा‍युती योजना सुरु केल्‍यानंतर आघाडीच्‍या नेत्‍यांना आता जाग आली आहे. पण तुमच्‍या योजनांची आश्‍वासनं ही खोटी आहेत जनता तुम्‍हाला धडा शिकविल्‍या शिवाय राहणार नाही असा इशाराही त्‍यांनी दिला.

जाहिरात

       महायुती सरकार हे देणारे सरकार आहे. मागील अडीच वर्षात शेतकरी, महिला युवक यांच्‍यासाठी योजना सुरु केल्‍या. केवळ घोषणा नाही तर, प्रत्‍यक्ष अंमलबजावणी झाल्‍यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्‍यांच्‍या बॅक खात्‍यामध्‍ये जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तर महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्‍याय सुरु झाला आहे. भाजपाने आता आपल्‍या  संकल्प पत्रात या योजनेतील अनुदाची रक्‍कम २१०० रुपये करण्‍याचे वचन दिले असून, सत्‍ता येताच त्‍याचीही अंमलबजावणी होईल अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

       शिर्डी मतदार संघात सुरु असलेली विकास प्रक्रीया शेजारच्‍यांना देखवत नाही. त्‍यामुळेच आता बगलबच्‍चे पुढे करुन येथील विकास कामांमध्‍ये  अडथळे निर्माण करण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडून सुरु झाले आहे. आज मत मागायला जे येत आहेत त्‍यांना यापुर्वी कधी या तालुक्‍याची आठवण झाली नाही. आघाडी सरकारच्‍या काळात मंत्री होते, पण कोव्‍हीड संकटात तालुक्‍यातील जनतेची साधी विचारपुसही केली नाही. प्रवरा परिवाराने मात्र कोव्‍हीड संकटात तीन रुग्‍णालयातील हजारो माणसांना सामाजिक बांधिलकीने मदत केली.

याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, निळवंड्याच्‍या  बाबतीत सुध्‍दा केवळ राजकारण करण्‍यात काहींनी धन्‍यता मानली. केवळ विखे पाटील परिवाराची बदनामी करणे हेच त्‍यांचे उदिष्‍ठ होते. राज्‍यात महायुतीचे सरकार असल्‍यानंतर निळवंडे कालव्‍यांच्‍या  प्रश्‍नाला किंवा कामांना खरी गती मिळाली. यासाठी जेष्‍ठनेते मधुकरराव पिचड यांचेही सहकार्य मिळाले. त्‍यांच्‍या सहकार्यामुळे पहिल्‍या वीस किलोमीटर अंतरावरील कालव्‍यांचे काम सुरु झाले. त्‍यामुळेच पाणी येवू शकले.

       परंतू अनेक वर्षे सर्व सत्‍तास्‍थाने ताब्‍यात असतानाही संगमनेरच्‍या  नेत्‍यांनी कालव्‍यांची कामे होवू दिली नाहीत. त्‍यांना हा प्रश्‍न सुटावा अशी इच्‍छाच नव्‍हती, कारण त्‍यांचे राजकारण या प्रश्‍नाभोवतीच होते. अनेक निवडणूका या प्रश्‍नाचे भांडवल करुन जिंकल्‍या. राहाता तालुक्‍यातीलच नव्‍हे  तर संगमनेर तालुक्‍यातील जिरायती भागालाही पाणी मिळवून देण्‍याचे भाग्‍य शेवटी आपल्‍यालाच मिळाले. कारण पाणी मिळवून देण्‍याचा दिलेला शब्‍द मी पुर्ण केला असे ना.विखे पाटील यांनी सांगितले.

       या भागातील युवकांच्‍या रोजगारासाठी औद्योगिक वसाहत आता निर्माण होत असून, त्‍याचे कामही सुरु झाले आहे. अनेक उद्योजक या भागात येण्‍यास तयार झाले असल्‍याने रोजगाराची मोठी संधी उपलब्‍ध होईल. कौशल्‍य शिक्षण मिळावे म्‍हणून, आचार्य चाणक्‍य युवा प्रशिक्षण योजनेची २४ केंद्र प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून सुरु करण्‍यात आली असून, याचा उपयोग युवक, युवतींना होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे