एस जे एस हॉस्पिटल ग्रुप कोपरगाव

गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्यासाठी आर जे एस फाउंडेशने घेतला पुढाकार;  ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्यासाठी आर जे एस फाउंडेशने घेतला पुढाकार;  ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्यासाठी आर जे एस फाउंडेशने घेतला पुढाकार;  ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२४ :- सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसत आहे. वेगवेगळे रक्तगट असल्याने जो रुग्णांना रक्तगट हवा आहे तो मिळणे शक्य होत नाहीये.

जाहिरात

गरजू रुग्णांना रक्त पुरेसे वेळेवर मिळावे तुटवडा जाणवू नये यासाठी कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक, होमिओपॅथी,नर्सिंग, फिजियोथेरपी, फार्मसी या कॉलेजच्या वतीने जागतिक रक्तदान शिबिराचे श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

या शिबिरात सर्व कॉलेजच्या प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी संजीवनी ब्लड बँक कोपरगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्त संकलित करण्यासाठी कोपरगाव येथील संजीवनी ब्लड बँकेचे डॉ.नीता पाटील डॉ.कविता चौधरी,डॉ.जयश्री आढाव यांनी रक्त संकलित केले. या शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे