आपला जिल्हा

कोपरगावमध्ये घुमणार अमित शाह यांची गर्जना; कोल्हेंना मिळणार राजकीय बळ ?

कोपरगावमध्ये घुमणार अमित शाह यांची गर्जना; कोल्हेंना मिळणार राजकीय बळ ?

कोपरगावमध्ये घुमणार अमित शाह यांची गर्जना; कोल्हेंना मिळणार राजकीय बळ ?

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५कोपरगाव तालुक्यात ५ ऑक्टोबर रोजी देशातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक, केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्या आगमनाने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाह यांचा कोपरगाव दौरा निश्चित झाला असून प्रशासनाने अलर्ट मोडवर तयारी सुरू केली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागांनी सुरक्षा व्यवस्था व दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती चाचपणी सुरू केली आहे.

जाहिरात

या दौऱ्यामागील उद्देश काय असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, भाजपमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कोल्हे कुटुंबाचे निमंत्रण शाह यांनी स्वीकारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय संदर्भ काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

जाहिरात

दरम्यान, टीम विवेक कोल्हे यांनी सामाजिक माध्यमांतून टिझर लाँच करून या दौऱ्याची उत्सुकता अधिक वाढवली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणावर स्वागताची तयारी सुरू झाली आहे. कोपरगावमध्ये शाह यांच्या उपस्थितीत कोणते महत्त्वाचे निर्णय किंवा घोषणा होणार का, याबाबत आता सर्वांचे डोळे या दौऱ्याकडे लागले आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे