आपला जिल्हा

एस. एस. जी. एम महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न

एस. एस. जी. एम महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न

एस. एस. जी. एम महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेल, संगणक विज्ञान विभाग, आय.क्यू.ए.सी. व “अश्वमेध अग्रीटेक अँड फार्म सोल्युशन सिस्टीम, कोपरगाव” यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केलेले होते.

जाहिरात

सदर मुलाखतीसाठी ‘अश्वमेध अग्रीटेक अँड फार्म सोल्युशन सिस्टीम, कोपरगाव’ यांच्या वतीने डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे चेअरमन (अश्वमेध अग्रीटेक अँड फार्म सोल्युशन सिस्टीम) व त्यांचे सहकारी, या तज्ञांची समिती आली होती. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये एकूण ०९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी संगणक विज्ञान विभागातील ०२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जाहिरात

या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमाचे प्रास्ताविक करियर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. दिलीप भोये यांनी केले तर आभार प्रा. प्रतीक्षा रोहोम यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे