आपला जिल्हा

एस. एस. जी. एम महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न

एस. एस. जी. एम महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न

एस. एस. जी. एम महाविद्यालयात वाङ्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२५ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉलेज कॉमर्स कोपरगाव येथील ज्युनिअर विभाग अंतर्गत वाद्मय  मंडळाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व आत्मा मालिक न्यूज चैनलचे संपादक सागर आहेर हे लाभले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी भूषविले.

जाहिरात

   प्रमुख अतिथी सागर आहेर यांनी उद्घाटनपर मनोगतात, “विद्यार्थ्यांना वाद्मय मंडळाचे कार्य, साहित्याचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील महत्त्व आणि साहित्यातील करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले, त्याचबरोबर त्याच बरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा यांच्या सहयोगाने विविध उपक्रम आयोजन केले जाते त्यामुळे विद्यार्थाच्या भाषिक व बौद्धिक क्षमतेत भर पडत असतो.” असेही स्पष्ट केले.

जाहिरात

   अध्यक्षीय मनोगतात डॉ.अर्जुन भागवत म्हणाले की, “ मराठी ही केवळ भाषा नसुन आपल्या संस्कृतीचे विचारांचे आणि अभिव्यक्तीचे माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातून आपली नवीन ओळख निर्माण होते. मराठी वाचनामुळे आपण विचारशील होतो आपले भाषण समुद्ध होते आपले लेखन प्रभावी होते त्यामुळे आजच्या काळात भाषेत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे”. असे स्पष्ट केले.

    सदर कार्यक्रमाचे व स्वागत प्रा. मनीषा उमाप यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय संदीप शिंदे  यांनी करून दिला.  सदर कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, तसेच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. एन. टी. बिरारी यांनी मानले, तर सुत्रसंचालन जयश्री शेंडगे यांनी केले

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे