के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

कोपरगाव विजय कापसे दि ५ नोव्हेंबर २०२५– कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. मुक्त पत्रकार व लेखक प्रा. जावेद शाह हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, ग्रंथपाल डॉ. निता शिंदे, वरिष्ठ शिक्षिका श्रीमती सोनवणे, श्रीमती बालवे, प्रा. संदीप जगझाप हे उपस्थित होते.

मराठी विभागाचे प्रा. सूर्यवंशी यांनी याप्रसंगी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे स्वरूप व भूमिका स्पष्ट केली. प्रा. जावेद शाह यांनी आपल्या भाषणात वाचनाचे महत्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे व त्यासाठी वाचन संस्कृती रुजवणे अनिवार्य आहे असेही प्रतिपादन प्रा. जावेद शाह यांनी केले. डॉ. निता शिंदे यांनी कोणते ग्रंथ आवर्जून वाचावे हे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना ग्रंथालयात आवर्जून येण्याचे आवाहन केले.

यावेळी व्याख्याते प्रा. जावेद शाह यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. प्रवीण वैद्य यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविकांत मरभळ यांनी केले.



