आपला जिल्हा

परमपूजनीय सदगुरु आत्मा मालिक माऊली यांच्या दिव्य उपस्थितीमध्ये नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी उत्साहात; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह हजारों भाविकांची उपस्थिती

परमपूजनीय सदगुरु आत्मा मालिक माऊली यांच्या दिव्य उपस्थितीमध्ये नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी उत्साहात; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह हजारों भाविकांची उपस्थिती
परमपूजनीय सदगुरु आत्मा मालिक माऊली यांच्या दिव्य उपस्थितीमध्ये नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी उत्साहात; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह हजारों भाविकांची उपस्थिती
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ मार्च २०२६नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठातील संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेली ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ आज मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात पार पडली. पंचक्रोशीतील तसेच नाशिक, मालेगाव परिसरातील हजारो भाविकांनी या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जाहिरात
ठरलेल्या मार्गानुसार साईबाबा कॉर्नर येथून सुरू झालेली ही दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमात येऊन संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर मंगल वाद्यांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला.
या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांची दिव्य उपस्थिती होय. त्यांच्या दर्शनाचा लाभ उपस्थित हजारो भाविकांना झाला. तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या सर्वांचे  संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वतीने प.पु.आत्मा मालिक माऊली व पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या संत निजानंद महाराज,संत अशोक महाराज, संत सार्थकानंद महाराज, अथर्वानंद महाराज, सुनील महाराज, विलास भामरे, सुरेश माळोदे, रामेश्वरी माई , ज्ञानेश्वरी माई, स्वरूपा माई, तपस्विनी माई, शोभा शेलार, ललिता भालरे, सुनीता काळे, आशा सोनवणे, प्रज्ञा मिश्रा, सुमन निकम, निर्मला लाटे,  छाया मोटे व वंदना इंगळे यांच्यासह आदींचे व संतांचे पूजन व स्वागत करण्यात आले.

जाहिरात
 तसेच या मंगल प्रसंगी त्यांच्या हस्ते नर्मदा मातेचे जलपूजन करून संतांवर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज, संत शांतिमाई, स्मृतिमाई, ध्यानीमाई, संत चांगदेव महाराज, विष्णुदास महाराज, प्रेमानंद महाराज,दत्तगिरी महाराज तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष  नंदकुमार सूर्यवंशी उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, विश्वस्त प्रदीप भंडारी, प्रकाश गिरमे व अन्य विश्वस्त उपस्थित होते.  या भव्य दिंडी सोहळ्यात कोपरगाव शहरातील नागरिकांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जाहिरात
संत परमानंद महाराज यांनी या स्वागतासाठी विवेकभैय्या कोल्हे आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.युवकांना दिशा देण्यासाठी अतिशय दर्जेदार काम सुरू आहे.युवा वयात आदर्श विचार जोपासून संस्कारशील जीवन घडवत आहे.व्यापक कार्यासाठी अध्यात्मिक उर्जेची ताकद पाठीशी असावी लागते.कोल्हे कुटुंबाचे मोठे योगदान या परिसरातील अध्यात्मिक वातावरण वाढवण्यात आहे असे परमानंद महाराज यांनी आशीर्वाद दिले.
यावेळी शुभेच्छा व्यक्त करताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की अतिशय मोठी परिक्रमा करून आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत व साधक आले आहेत. कोपरगाव कर म्हणून अभिमान वाटतो की असे अध्यात्मिक शक्तीकेंद्र आपल्या भागात आहे.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हा परिसर पावन झाला आहे. माजी मंत्री स्व.कोल्हे साहेबांपासून आमचा ऋणानुबंध तीन पिढ्यांचा आहे.या पवित्र परिक्रमेसाठी तब्बल 3600 किमीचा प्रवास करून सर्वजण परतले आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनीही आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याची ऊर्जा दिली आहे.जीवन जगताना साधू संत देखील नीतिमूल्यांचे आशीर्वाद देत असतात त्यामुळे जीवनात सर्व संकटाना प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे