आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये इंटरॅक्टीव पॅनेल प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये इंटरॅक्टीव पॅनेल प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये इंटरॅक्टीव पॅनेल प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १७ ऑक्टोबर २०२५:  ‘रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शरदचंद्रजी पवार यांच्या सूचनेनुसार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी तसेच संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक वर्ग खोलीमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, याद्वारे विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळण्यासाठी तसेच ऑनलाईन प्रशिक्षणाचा वापर करण्यात येऊन प्रत्यक्ष वर्गामध्ये त्याचे प्रात्यक्षिक देणे अत्यंत सुलभ आणि सोपे होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची अडचण असताना देखील विविध शाखाप्रमुखांनी आपली नेहमीची कामे बाजूला ठेवून तसेच वर्गणीच्या माध्यमातून आपल्या शाळा खोल्यांमध्ये इंट्रॅक्टिव्ह पॅनेल बसवले आहेत.’ असे उद्गार रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी काढले.

जाहिरात

ते एस.एस.जी.एम महाविद्यालयात आयोजित  इंट्रॅक्टिव पॅनेल प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते. .याप्रसंगी  प्रमोद तोरणे पुढे म्हणाले की, “अनेक अडचणींवर मात करून आपण वर्गा-वर्गात अत्याधुनिक पद्धतीने शिकविता येईल. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक सर्जनशील बनवेल, असे एंट्रेक्टिव्ह पॅनल प्रत्येक वर्गात बसवले आहेत. तो नेमका कसा वापरायचा याबद्दलचे संभ्रम दूर झाले पाहिजे, प्रत्येक शिक्षकाला तो सहजपणे हाताळता आला पाहिजे, त्यातील प्रत्येक अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण प्रत्येक तालुक्यात जाऊन करणे हे संस्थेचे एक काम आहे, प्रशासनाचे काम आहे.”असे त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले की, ‘आपला उत्तर विभाग हा गुणवत्तेमध्ये प्रथम आहे. प्रशिक्षण घेणे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करून देणे, हा शिक्षकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. उत्तर विभागात एकूण ७४२ शाखा आहेत. नवीन काही करणे आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे हे ध्येय धोरण आणि उद्दिष्ट आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवताना ठेवले आहे. आज एकूणच तंत्रज्ञान बदलत आहे. डिजिटल युगात विद्यार्थ्यांचे भविष्य हे त्याचा सर्वांगीण विकास होण्यात आहे”असे यावेळी स्पष्ट केले.

जाहिरात

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील विविध शाखांमधील  काशिनाथ लव्हाटे सर,  लंके सर, दरेकर सर उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे  उपप्राचार्य  संजय  शिंदे यांनी केले तर आभार  कळमकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  सुनिता अत्रे आणि  अरुणा चिंधे यांनी केले. सदर कार्यशाळेसाठीकोपरगाव तालुक्यातील  शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे