आपला जिल्हा

१०८ वर्षापासून दिवाळी पाडव्याला ग्रामसभा घेणारे लोणी बुद्रुक गाव

१०८ वर्षापासून दिवाळी पाडव्याला ग्रामसभा घेणारे लोणी बुद्रुक गाव

देशपातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित होणारी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत; बॅकेत ठेवी असलेली एकमेव ग्रामपंचायत

जाहिरात

लोणी विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२५
ग्रामस्थ आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने देश व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले. गावात अनेक विकासकामे झाली. गावाच्या एकोप्यामुळे अडीच कोटींच्या ठेवी असलेली ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जाहिरात

१०८ वर्षांपासून लोणी बुद्रुक येथे दिवाळी पाडव्याला ग्रामसभेचे आयोजन केले जाते. बुधवारी झालेल्या ग्रामसभेला जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.

जाहिरात

उपस्थितांना मार्गदर्शन करताना ना.विखे म्हणाले की, ग्रामस्थ आणि नागरिक यांच्या सहकार्या शिवाय ग्रामपंचायत लोकाभिमुख काम करू शकत नाही. गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांच्यासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाले. काळानुरूप विकासाचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. व्यावसायिकांनी गाळा भाडे, नागरिकांनी पाणी व घरपट्टी भरून पंचायतीला सहकार्य केले पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी आपण मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील आहोत.

जाहिरात

लोणी हे गाव शैक्षणिक केंद्र असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी ग्रामस्थानी जागरूक राहिले पाहिजे. जलसंपदा विभागाच्या वतीने अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ओढे, नाले यातून पाणी निघून जाण्यात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यात येणार आहेत. त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, लोणी गावचा वेगाने विस्तार होत आहे. त्यासोबतच सोयी सुविधा निर्माण करण्याचे आव्हान ग्रामपंचायतीपुढे असते. ना.विखे पाटील यांच्यामुळे निधी उपलब्ध होण्यात अडचण येत नाही. बाजारपेठ वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची नवीन योजना पूर्णत्वाकडे आहे.सर्वांगीण विकासात गाव आघाडीवर आहे.

सरपंच कल्पना मैड, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, ट्रॅक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव धावणे, उपाध्यक्ष नाना म्हस्के, उपसरपंच गणेश विखे, एम वाय विखे, रंगनाथ विखे, वसंतराव विखे, अण्णा म्हस्के, विजयराव लगड, बाळासाहेब वाबळे, दिलीपराव विखे, प्रवीण विखे, भाऊसाहेब धावणे, रामभाऊ विखे, भाऊसाहेब धावणे, गणेश विखे, भाऊसाहेब विखे, दादासाहेब म्हस्के, नवनाथ विखे, प्रा.बाळासाहेब विखे, सोपान विखे, यांच्यासह ग्रामस्थ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी अनिल एकनाथ विखे यांनी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी कविता आहेर यांनी विकास कामांची माहिती दिली.माजी उपसरपंच अनिल नानासाहेब विखे यांनी आभार मानले.

पोट भाडेकरूंची पोलिस पडताळणी : डॉ.विखे पाटील

गावात जे लोक पोटभाडेकरू म्हणून ज्यांच्या घरात राहतात त्यांची माहिती घरमालकाने ग्रामपंचायतीकडे देणे आवश्यक आहे. प्रत्येक भाडेकरूंची आता पोलिस पडताळणी होणार आहे. गावात गुन्हेगारी येऊ नये व इथल्या महिला व मुली यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. गावातील विकासाच्या सुरू करण्यात आलेल्या व्यापारी संकुल व बहुउद्देशीय सभागृह, भाजीपाला विक्री शेड, मटण मार्केट आणि घनकचरा प्रक्रिया केंद्र यांच्या सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची माहिती त्यांनी ग्रामस्थाना दिली. गावातील ज्या कुटुंबात आजपर्यंत व्यापारी संकुलात एकही गाळा मिळालेला त्यांना प्राधान्याने नुतन संकुलात गाळा देणार असल्याचे सांगितले. लोणी बुद्रुक गावात गुन्हेगारीला शिरकाव करू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे