आपला जिल्हा

रक्तदान म्हणजे गरजवंताला जीवदान- चैताली काळे

रक्तदान म्हणजे गरजवंताला जीवदान- चैताली काळे
रक्तदान म्हणजे गरजवंताला जीवदान- चैताली काळे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२४जगात सर्व श्रेष्ठ हे रक्तदान असुन ते दान करणे म्हणजे साक्षात गरजवंताला जीवनदान देणे होय असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी वारी गावात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील जय संजय जाधव मित्र मंडळातर्फे  भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, गोदावरी बायोरिफायनरीज लीमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, कोपरगाव तालुका भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव जाधव, कोपरगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुरेश जाधव, रमेश टेके, आण्णासाहेब ठोंबरे, वारीच्या सरपंच योगीता बद्रीनाथ जाधव, विजयसिंह गायकवाड, नवनाथ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
    स्व. जय जाधव यांच्या वर प्रेम करणारे  मित्र मंडळ मोठ्या प्रमाणात परिसरात होते त्याच्या या मित्र मंडळींनी एकत्र येत श्री साईबाबा संस्थांन शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने वारीत रक्तदान शिबीर भरवले होते.या शिबिरात वारी सह परिसरातील ५० हुन अधिक दात्यांनी रक्तदान केले.  तर हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी जय जाधव यांचे जिवलग मित्र प्रतीक हिवाळे, नाना भारुड, विशाल मोरे, संतोष उशीर, गणेश महापूर, प्रशांत जगताप यांनी विशेष प्रयत्न घेतले असून जय जाधव यांच्या मित्र मंडळीने वारी सारख्या ग्रामीण भागात राबविलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे