आपला जिल्हा

तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय देवकर तर सचिवपदी अनुप गिरमे यांची निवड

तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय देवकर तर सचिवपदी अनुप गिरमे यांची निवड
तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय देवकर तर सचिवपदी अनुप गिरमे यांची निवड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जुलै २०२५-

कोपरगांव तालुका क्रीडा शिक्षकांची  सहविचार सभा नुकतीच कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न होऊन यकात सन २०२५-२६ विविध खेळ स्पर्धा व नूतन कार्यकारिणी  निवड आदी विषयांवर महाराष्ट्र  राज्य बेसबॉल असोशिएशन चे सहसचिव तथा अहिल्यानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव  मकरंद को-हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जाहिरात
या प्रसंगी अहिल्यानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  अरुण चंद्रे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व कोपरगाव तालुका क्रीडा संकुल सदस्य राजेंद्र पाटणकर, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक  विठ्ठल होन, सुधाकर निलक,अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक सचिन जाधव आदि  उपस्थित होते.

जाहिरात
 यावेळी विविध क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजन संदर्भात चर्चा करून सन २०२५-२६ वर्षाची क्रीडा स्पर्धेचे अंदाजे स्पर्धाचे वेळापत्रक ठरवत तालुक्याची  नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात शारदा इंग्लिश मिडीयमचे क्रीडाशिक्षक  धनंजय देवकर यांची अध्यक्षपदी तर संजीवनी इंग्लिश मेडीयमचे क्रीडाशिक्षक अनुप गिरमे यांची सचिव म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली.

जाहिरात
तर या नूतन कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून सुधाकर निलक, निलेश बडजाते, अजित पवार, शिवराज पाळणे,सहसचिव म्हणून  राजेंद्र देशमुख व अशोक गायकवाड तर कार्यकारिणी सदस्य म्हणुन  रमेश येवले, सुनील कदम, वीरूपाक्ष रेड्डी, अस्मिता रायते यांचा समावेश करण्यात आला. याप्रसंगी तांत्रिक समिती सदस्य म्हणुन नितीन निकम, योगेश बिडवे रिजवान पठाण,लतीफ शेख,ऋतिक भाबड ,भामरे नेद्रे तर जिल्हा प्रतिनिधी शिवप्रसाद घोडके आदी निवड करण्यात आली. या सहविचार सभेला सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप गिरमे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवप्रसाद घोडके यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे