आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहरातील विकासकामांना गती – नगराध्यक्ष पराग संधान

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहरातील विकासकामांना गती – नगराध्यक्ष पराग संधान
आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहरातील विकासकामांना गती – नगराध्यक्ष पराग संधान

Kopargaon vijay kapse दि १८ मे २०२६–कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील विकासकामांना वेग मिळत असून प्रभाग क्रमांक ११ मधील वाघ घर ते कन्या शाळा रस्ता व अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बालाजी अंगण ते किरण मवाळ घर रस्ता कामाचे भूमिपूजन सोमवार (दि. १८ मे २०२६) रोजी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले की, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोपरगाव शहरातील विकासकामांना खऱ्या अर्थाने गती मिळत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील वाघ घर ते कन्या शाळा रस्ता व अंतर्गत रस्त्यांचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा पुरवणे योजनेअंतर्गत सुमारे ६० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. तसेच बालाजी अंगण ते किरण मवाळ घर रस्ता कामासाठी सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील नागरिकांना दर्जेदार व सुकर रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाहतुकीची गैरसोय दूर व्हावी तसेच परिसराच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यातही कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, बांधकाम सभापती नीलोफर पठाण, नगरसेवक प्रशांत कडू, नगरसेविका सोनम त्रिभुवन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, बांधकाम अभियंता सागर मोटे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक वैभव आढाव, गटनेते प्रसाद आढाव, बाळासाहेब कडू, डॉ. विलास आचारी, डॉ. योगेश बनकर, नारायण सारंगधर, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अतुल काले, सोमनाथ म्हस्के, आकाश वाजे, दत्तुमामा पगारे, कालूआप्पा आव्हाड, कैलास मंजुळ, स्वप्निल मंजुळ, सनी वाघ, रोहित दादा वाघ, राकेश काले, फिरोज पठाण, दिपक जपे, सलीम पठाण, रोहित कनगरे, संपत चंदनशिव, बाळासाहेब पवार, योगेश नरोडे, पंढरीनाथ वक्ते, सतीश रानोडे, दिपक अग्रवाल, ऋषिकेश गायकवाड, शेखर कडू, महेश खैरनार, प्रकाश वैद्य, मयूर सोनवणे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर गोसावी, राहुल अजमेरे, महेश दुशिंग, राहुल रुईकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक-नगरसेविका व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





असेच कार्य टाकळी रोड बाबत घडावे
असेच कार्य टाकळी रोड बाबत घडावे पावसाळा सुरू होण्यापूर्वी घडावा