प्रभाग ५ मधील दमदार उमेदवार; शोभा घायतडकर व अमित आगलावे
प्रभाग ५ मधील दमदार उमेदवार; शोभा घायतडकर व अमित आगलावे
प्रभाग ५ मधील दमदार उमेदवार; शोभा घायतडकर व अमित आगलावे

कोपरगाव विजय कापसे दि २० नोव्हेंबर २०२५–राज्यातील सर्वच नगरपालिका निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट झाले झाल्याने कोपरगाव नगरपालिकेच्या १५ प्रभागातील उमेदवाराने वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत प्रचाराला सुरुवात केल्याने शहरातील गल्लीबोळातील वातावरण राजकीय झाल्याचे दिसून येत आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे उमेदवारी करत आहे तर कोपरगाव शहरातील ३८०६ मतदार असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मधील (अंबिका नगर,शारदानगर, कालिका नगर, वडांगळे वस्ती, येवला रोड, कालिंदी नगर, अन्नपूर्णा नगर, गरिमा नगरी, एसएसजीएम कॉलेज परिसर, पशु पैदास केंद्र, के बी पी विद्यालय परिसर) सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेल्या शोभा अशोक घायतडकर व अमित चंद्रकांत आगलावे हे अत्यंत दमदार उमेदवार असून प्रचारात देखील त्यांनी वेग घेतल्याचे पहावयास मिळत आहे.

शोभा घायतडकर या डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ कुणाल अशोक घायतडकर यांच्या आई तर डॉ. भाग्यश्री घायतडकर यांच्या सासूबाई आहे. डॉ घायतडकर परिवार नेहमीच सामाजिक, धार्मिक, कामात आग्रेसर परिवार म्हणून सर्व परिचित आहे. डॉ.घायतडकर दांपत्य आपल्या डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटल तसेच अशोकराव घायतडकर सेवाभावी ट्रस्ट यांच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिरे राबवत असतात तसेच आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधत मोफत आरोग्य तपासणी उपचार तर वृक्षारोपण मोहीम राबवतात. गणपती व नवरात्र उत्सव देखील अभिनव उपक्रमाने ते साजरे करत असतात.डॉ कुणाल घायतडकर यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत प्रभागातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावले आहे तर शोभा घायतडकर या देखील प्रभागातील सामाजिक धार्मिक कार्यात हिररीने सहभाग घेत असतात त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहे.

आमदार आशुतोष काळे गटाकडून उमेदवारी करत असलेले प्रभाग क्रमांक ५ मधील शोभा अशोक घायतडकर व अमित चंद्रकांत आगलावे यांना जनतेने काम करण्याची संधी दिली तर त्या संधीचे सोन करत आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे घायतडकर व आगलावे यांनी सांगितले.



