अजिंक्य रहाणे व पूनम खेमनर यांनी क्रिकेटमध्ये संगमनेरचे नाव देशपातळीवर नेले – डॉ. जयश्रीताई थोरात
मुंबई इंडियन संघात निवड झाल्याबद्दल डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याकडून सत्कार

सुदर्शन निवासस्थानी मुंबई इंडियन्स संघात निवड झाल्याबद्दल पुनम खेमनर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिची आई,वडील व कुटुंबीय उपस्थित होते. गळाभेट घेऊन पूनम खेमनर हिचे अभिनंदन करत.डॉ.जयश्रीताई थोरात यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भारताचे माजी कर्णधार कसोटीपटू अजिंक्य रहाणे यांनी संगमनेरला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले तर पुनम खेमनर राज्य पातळीवर अत्यंत लौकिकास्पद कामगिरी करत आहे. क्रिकेटमध्ये या दोघांनी संगमनेरचे नाव मोठे केले. याचबरोबर तालुक्यातील विविध युवक आणि युवती रणजी आणि राज्यपातळीवर खेळत असून यामुळे क्रीडा क्षेत्रातून तालुक्याचे नाव मोठे झाले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम तरुणांना करिअरमध्ये वेगवेगळ्या संधी मिळावा याकरता व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रोत्साहन दिले आहे. संगमनेर तालुक्यातील तरुण हेच आपले वैभव असून प्रत्येक तरुणाने आपल्या आवडत्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान दिल्यास त्यांना नक्की यश मिळेल असे त्या म्हणाल्या.
तर पूनम खेमनर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम मला खूप सहकार्य केले आहे. ज्या ज्या वेळेस माझ्याकडून चांगला खेळ झाला त्या त्या वेळेस फोन करून अभिनंदन केले आहे. त्यांचा फोन येणे ही मोठी प्रेरणा आहे. डब्ल्यू पी एल मध्ये खेळताना हरमनप्रीत कौर, स्मृती मानधन यांच्याबरोबर खेळण्याचा योग आला. पण मी संगमनेरची म्हटले की पहिले नाव येते बाळासाहेब थोरात साहेब यांचे. त्यांचा कायम आशीर्वाद असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित सर्व युवक व युवतींनी पुनम खेमनर यांचे अभिनंदन केले. याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात,आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनीही पुनम खेमनर अभिनंदन केले आहे.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूंशी संगमनेर मधील सामन्यात सहभाग
पुनम खेमनर लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसेल
महिला दिनानिमित्त डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने संगमनेर तालुक्यातील युवती व महिलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पुनम खेमनर यांनी सहभाग नोंदवला. याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटू यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात टी ट्वेंटी क्रिकेट सामना खेळला गेला. यामध्ये संगमनेर कडून पुनम खेमनर हिने प्रतिनिधित्व केले. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की आपल्या गावची पुनम लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.




