आपला जिल्हा

के.जे. सोमैया महाविद्यालयात संविधान जागृती उपक्रम साजरा 

के.जे. सोमैया महाविद्यालयात संविधान जागृती उपक्रम साजरा

के.जे. सोमैया महाविद्यालयात संविधान जागृती उपक्रम साजरा 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ डिसेंबर २०२५कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना  विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संविधान जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात संविधान जागृती पथनाट्य, रांगोळी, संविधान जागृती व्याख्यान व संविधानाचे महत्त्व नमूद करणारे गीत इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बनविलेल्या संविधान विषयक पथनाट्याच्या सादरीकरणाने झाली. या पथनाट्यातुन स्वयंसेवकांनी संविधानाचे विविध कलमे व अधिकार समजुन सांगितले.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष मा.ॲड. मनोहर येवले उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास, महत्व व संविधानाने प्राप्त झालेले अधिकार व कर्तव्ये यांची माहिती उपस्थितांना देतानांच संविधान हा लोकशाहीचा व जनतेच्या न्याय हक्काचा पाया असल्याचे म्हटले. कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात मा. अरुण त्रिभुवन, मा. संजय दुशिंग, मा.नितीन शिंदे, मा.वैभव पगारे व मा.प्रदीप अहिरे यांनी संविधान जागृती विषयक विविध गीते सादर झाली. कार्यक्रमाच्या स्वागत मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाला संविधान जागृती उपक्रम आयोजनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्‍त करतांना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानिक अधिकाराबरोबरच सामाजिक कर्तव्याची माहीती मिळण्यास मदत होईल असे म्हटले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संविधानिक मूल्ये जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

जाहिरात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त  संदीपराव रोहमारे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड़ यांनी केला.   सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय दवंगे यांनी केले. या उपक्रमासाठी डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. रविंद्र जाधव, प्रा.रोहिणी घुगे, प्रा. किरण सोळसे हे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे