आपला जिल्हा
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाचे सतशील आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाचे सतशील आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

संगमनेर प्रतिनिधी दि १२ डिसेंबर २०२५– देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापती असे विविध पदे भूषवताना स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी सर्वांना न्याय दिला. लोकशाही आणि काँग्रेस संस्कृतीला ताकद देण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले असून त्यांच्या निधनाने देशाचे सतशील प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.