ॲडजस्टमेंट न करता वेळेवर आर्थिक पत्रके जाहीर करणारी समता महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था – काका कोयटे
समताची ३९ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १४ मे २०२४ : समता नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चला दुपारी ३ वाजता अन् ऑडिटेड बॅलन्स शीट आणि ११ मे ला ऑडिटेड बॅलन्स शीट जाहीर केली जात असतात. या बाबत कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट न करता, कमीत कमी शाखांमध्ये वेळेवर आर्थिक पत्रके जाहीर करणारी समता पतसंस्था महाराष्ट्रातील सर्व प्रथम व एकमेव पतसंस्था ठरली असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा प्रकारचे उद्गार समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

तसेच संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम विषयी सविस्तर माहिती देत समतात ९९ . ८१ टक्के ठेवीदारांच्या ठेवी प्रत्येकी ३५ लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले तर जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इति वृत्तांत सांगितला. तसेच कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पापडीवाल नायब तहसीलदार चंद्रकांत कुलथे यांच्या उपस्थितीत संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.


या सर्वसाधारण सभेला संस्थेचे संचालक जितुभाई शहा, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, संदीप कोयटे, गुलशन होडे, कांतीलाल जोशी, कचरू मोकळ, बोर्ड सेक्रेटरी संतोष मुदबखे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, ज्योत्स्ना पटेल, संस्थेचे ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संजय पारखे यांनी मानले.
