नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण — बाळासाहेब थोरात

सुदर्शन निवासस्थानी नाताळ सणा निमित्त येशू गीतांचा जागर

संगमनेर विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२५—मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. प्रार्थना ही प्रत्येकाला देवाजवळ घेऊन जात असून सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी एकत्र प्रेमाने राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळ व नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सुदर्शन व प्रभा निवासस्थानी नाताळनिमित्त गाणी येशू जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी मा आमदार डॉ.सुधीर तांबेरेव्ह. सतीश मिरजकर , सह्याद्री संस्थेचे सहसचिव प्रा. बाबा खरात ,सत्यानंद कसाब , स्वप्निल कसाब,प्रवीण रोहम, राजेंद्र सांगळे, अंतून घोडके ,हन्ना जाधव, विलास जाधव, विजय खंडीझोड, भाऊसाहेब नेटके, प्रा. गणेश गुंजाळ ,प्रा संजय जगताप, नितीन आल्हाट आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाताळ हा बंधुभाव आणि मानवता सांगणारा सण आहे. जगामध्ये मोठ्या आनंदाने हा सण साजरा होतो त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यातील सर्व ख्रिश्चन बांधव एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. प्रार्थना करतात प्रार्थनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना आनंद मिळावा यासाठी ते परमेश्वराच्या चरणी लीन होतात.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलेले आहे की प्रार्थना ही देवाजवळ घेऊन जाते. तर येशू ख्रिस्ताने दया क्षमा शांतीचा संदेश दिला आहे समाजातील गरीब वंचित यांना मायेने ख्रिस्ताने जवळ केले आचार विचार याचबरोबर शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी सर्वांना दिले. एकमेकाचे सण साजरी केल्याने आनंद हा द्विगुणीत होत असतो. मानवतेचा हा धर्म पुढे नेण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर मा.आ. डॉ. तांबे म्हणाले की, प्रत्येक माणसाने रागावर नियंत्रण मिळवत प्रेमाने जग जिंकायला हवे. नम्रता हे यशस्वीतेचे मोठे साधन असून नाताळ प्रेमाचा संदेश देत असतो. आजच्या अशांततेच्या वातावरणामध्ये प्रेमाचा संदेश हाच जगासाठी महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले यावेळी सौ दुर्गाताई तांबे यांनीही गीतामध्ये सहभाग घेतला.
येशू गीतांचा जागर
आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शन निवासस्थान व सौ दुर्गाताई तांबे यांच्या प्रभा निवासस्थानी येशू गीतांचा जागर करण्यात आला. यावेळी मानवतेच्या उद्धाराची विविध गीते उपस्थित आणि गायली.



