आपला जिल्हा

ग्रामपंचायत ने पूर्ण घरपट्टी माफ करावी–भास्करराव पानसरे

ग्रामपंचायत ने पूर्ण घरपट्टी माफ करावी–भास्करराव पानसरे
ग्रामपंचायत ने पूर्ण घरपट्टी माफ करावी–भास्करराव पानसरे
संगमनेर विजय कापसे दि ३१ डिसेंबर २०२५राज्यातील शेतकरी व गोरगरी माणूस अत्यंत अडचणीत आहे अशा काळात सरकारने त्यांना मदत केली पाहिजे. ग्रामपंचायत ने आपल्या हद्दीतील थकीत घरमालकांना निम्मी घरपट्टी माफ करण्याचे ठरविले आहे. ही पूर्ण घरपट्टी माफ करावी याचबरोबर नियमित भरणारे घरमालक यांनाही विशेष अनुदान द्यावे अशी मागणी घुलेवाडीचे माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी केली आहे.

जाहिरात
घुलेवाडी ग्रामपंचायत ने त्यांच्या हद्दीतील थकीत घरपट्टी मालकांना 50 टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना भास्कर पानसरे म्हणाले की हा निर्णय सत्य आहे परंतु जे लोक नियमित घरपट्टी भरतात त्यांचे काय खरं तर त्यांना अनुदान दिले पाहिजे याउलट सर्वांचीच घरपट्टी माफ करावी.

जाहिरात

ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक रस्त्यांची कामे खराब झालेली आहेत. ती रस्ते तातडीने करावी. नियमित व पूर्ण दाबाने पाणी मिळेल याकरता शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, भूमिगत गटारीची व्यवस्था करावी

जाहिरात

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे कांदा पिकाला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफी शासनाने केली पाहिजे याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कामे ग्रामपंचायत तातडीने करावी अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे