अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय अमृत फार्माथॉन २०२५ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न
अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय अमृत फार्माथॉन २०२५ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न
जाहिरात आत्मा
संगमनेर विजय कापसे दि १ एप्रिल २०२५– अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचालित अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर येथे राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या “ अमृत – फार्माथॉन- २०२५ ” संशोधन परिषदेचे आयोजन २८ मार्च, २०२५ रोजी करण्यात आले होते. अमृत – फार्माथॉन- २०२५ ही संशोधन परिषद विद्यार्थ्यामध्ये पदवीपूर्व संशोधनाची उत्सुकता निर्माण करणे, पदव्यूत्तर विद्यार्थाना संशोधन उपक्रमांसाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.
जाहिरात
अमृत – फार्माथॉन – २०२५ या परिषदेचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. रोहित डूबेपाटील, संचालक, ओराह न्युट्रीकेम प्रायवेट लिमीटेड, पुणे यांनी औषधनिर्माण शास्त्रातील संशोधनाचे महत्व आणि व्यवसाय यशस्वीतेबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख या देखील उपस्थित होत्या. “या स्पर्धेमुळे तरुण वर्गातील कल्पना शक्तीला चालना मिळेल आणि नवनवीन संशोधन जगासमोर मांडण्यासाठी अशा स्पर्धांची आवश्यकता आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. “या परिषदेमध्ये औषधनिर्माणशास्त्र विभागात संशोधन करण्याबाबत विध्यार्थ्यामध्ये जागृती निर्माण झाली आहे.” असे मत संस्थेचे अकॅडेमीक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव यांनी व्यक्त केले. या संशोधन परिषदेत अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, पुणे, शिरपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई सह महाराष्ट्रातील इतर शहरातील एकूण ३९० विद्यार्थी सहभागी झाले होते.जाहिरात
या परिषदेत पोस्टर प्रेजेंटेशन आणि ओरल अशा दोन फेरीतून स्पर्धा घेण्यात आली. या पोस्टर आणि ओरल स्पर्धेसाठी मूल्यांकन कर्त्यांना विविध बहुराष्ट्रीय फार्मा इंडस्ट्रीजचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ तसेच विविध फार्मसी संस्था आणि महाविद्यालयांतून तज्ञ प्राध्यापकांना आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेसाठी मूल्यमापन कर्ता म्हणून श्री. अमोल मोरे, संचालक, कोअर ऍनालिटिकल लि., नाशिक, श्री. गणेश म्हैसधुणे, नियामक व्यवस्थापक, सॅम्प्रास हेल्थ केअर लि., सिन्नर आणि अशोक कटकुरवार, माजी वरिष्ठ महाव्यवस्थापक, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि., नाशिक यांनी संशोधनाचे मूल्यांकन केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी दिली.
जाहिरात
या परिषदेमध्ये पदवी पातळीवर ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील विद्यार्थी कु. श्रेयस बरडे आणि सहकारी संशोधक विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. गोखले एज्युकेशन सोसायटीज् कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक येथील विद्यार्थी कु. यश पडवळ आणि सहकारी संशोधक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेरच्या कु. श्रेयस वदक आणि सहकारी संशोधक विद्यार्थ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. मातोश्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, धानोरे, येवल्याची विद्यार्थीनी कु. धनश्री जाधव, संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन अँड रिसर्च, कोपरगाव येथील विद्यार्थी कु. सिद्धार्थ पवार तसेच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील विद्यार्थीनी प्राची लोंढे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
पदव्यूत्तर पातळीवर वाय. बी. चव्हाण, कॉलेज ऑफ फार्मसी, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थीनी कु. कोमल शिंदे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील कु. नेहा भंडारे यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. सेंट जॉन इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पालघर येथील आरती पवार यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
पीएच डी पातळीवर राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा येथील कु. अजिंक्य पोटे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
“अमृत –फार्माथॉन- २०२५” संशोधन परिषदेचे समन्वयकाची जबाबदारी प्रो. बी. सी. घोडेस्वार आणि डॉ. जी. डी. घंगाळे यांनी पार पाडली. या संशोधन स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. विशाल मोरे यांनी केले. या संशोधन परिषदेसाठी पदवी विभागाकरिता समन्वयक डॉ. एम. एम. देशपांडे, डॉ. वि. के. निकम, प्रो. एच. वि. वेळीस यांनी, पदव्यूत्तर विभागाकरिता समन्वयक डॉ. डी. एन. राऊत, डॉ. विशाल मोरे यांनी, तसेच पीएच डी विभागाकरिता समन्वयक डॉ. डी. पी. हासे, डॉ. एस. एफ. सय्यद यांनी व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. परिषदेचे समन्वयक डॉ. जी. डी. घंगाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष राज्याचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व संस्थेचे विश्वस्त माजी आ.डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आणि अकॅडेमीक डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव यांनी स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.