आपला जिल्हा

ग्रामपंचायतींनी थकबाकी सवलत योजनेचा लाभ घ्यावा-गटविकास अधिकारी दळवी

ग्रामपंचायतींनी थकबाकी सवलत योजनेचा लाभ घ्यावा-गटविकास अधिकारी दळवी
ग्रामपंचायतींनी थकबाकी सवलत योजनेचा लाभ घ्यावा-गटविकास अधिकारी दळवी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ नोव्हेंबर २०२५मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत  ग्रामपंचायतींच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी व दिवाबत्ती थकीत कर वसुली थकबाकीवर राज्य शासनाने तब्बल ५० टक्के सवलतीची घोषणा केल्याने या निर्णयाचा लाभ राज्यातील सर्वच ग्रामपंचायती कार्यालय व  गृहकरदात्यांना होणार असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांनी दिली आहे.

जाहिरात
या विषयी दळवी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील ज्या निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर, पाणी पट्टी आणि दिवा बत्ती कर आदी करांच्या चालु वर्षाच्या पूर्ण रकमेसह १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या ५० टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास, एकूण मूळ थकबाकीच्या ५० टक्के सवलत राहील. ही सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्य व इतर मालमत्तांसाठी नसेल तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर आदी पूर्ण रक्कम अनिवार्यपणे भरावी लागेल सवलत फक्त गृह वसाहती मालमत्तांसाठीच असून औद्योगिक, व्यावसायिक किंवा इतर प्रकारच्या मालमत्तांना ही सवलत लागू नाही. सवलत देण्याचा अंतिम निर्णय ग्रामसभेचा असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर केल्यास ही सवलत मिळणार असल्याचे सांगितले.

जाहिरात
तर ही सवलत फक्त ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत थकीत रक्कम एक रकमी भरल्यावर लागू असून त्यानंतर ही सवलत मिळणार नाही. यातून ग्रामपंचायतींचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने देखील जास्तीत जास्त या योजनेची प्रसिद्ध करावी असे आवाहन गटविकास अधिकारी दळवी यांनी केले आहे.

संदीप दळवी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे