आपला जिल्हा

ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

 ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
 कोपरगाव विजय कापसे दि २२ फेब्रुवारी २०२६भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलचे शुक्रवार दि २०  फेब्रुवारी  रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संजीवनी महिला बचतगट अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

जाहिरात
 या प्रसंगी ऍड. जयंत जोशी, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, संस्थेचे अध्यक्ष  कैलाश ठोळे, सचिव  दिलीप अजमेरे, सहसचिव  सचिन अजमेरे, खजिनदार आनंद ठोळे तसेच सदस्य डॉ. अमोल अजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक  मकरंद निमोणकर यांनी प्रस्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा आढावा मांडला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
या वेळी शाळेचे संचालक राजेश ठोळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता जीवनातील मूल्ये आत्मसात करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली.तर ऍड. जयंत जोशी यांनी आपल्या भाषणात शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये अतिशय सुयोग्य समन्वय असल्यामुळेच हा कार्यक्रम उत्तम झाला असल्याचे प्रतिपादन केले व शाळेत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रसाद नाईक यांनी पालकांना मुलांचा कल कुठे आहे याचा विचार करून त्या दृष्टीने मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. तसेच सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रेणुका कोल्हे यांनी आपल्या भाषणात शाळेचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व प्रतिपादित केले. तसेच भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल कशी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करत आहे सांगून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्वेता भोपळे व मेघा फरताळे यांनी केले. नर्सरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, नाटिका, लोकनृत्य सादरीकरणे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृतींना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.

जाहिरात
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच रंगमंच व्यवस्था, सजावट, ध्वनी व्यवस्था आणि नृत्यदिग्दर्शक यांचेही विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याध्यापिका सौ. वर्षा आगरकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे