७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे उत्साहात साजरा.

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे उत्साहात साजरा.
७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे उत्साहात साजरा.

कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२५–कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम हर घर संविधान बाबत लोकजागृती प्रभात फेरीतून करण्यात आली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य ,सर्व पालक ग्रामस्थ, अंगणवाडी ताई सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील माजी सरपंच सलीम फत्तू पटेल हे होते.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संभाजी लांघे व गफार खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत घेण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिना विषयी भाषणे व देशभक्तीपर सदाबहार गीते सादर करण्यात आली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल शेठ गायकवाड यांचे भाषण झाले. त्यानंतर गावचे माजी उपसरपंच इरफान पटेल यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नाष्टा दिला.

तसेच त्यांनी देशभक्तीपर गाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे दिली. तसेच ग्रामपंचायत कार्यालय शिरसगाव सावळगाव यांनी विद्यार्थ्यांसाठी बिस्किटे खाऊ स्वरूपात दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी लांघे यांनी केले तर आभार प्रदर्शन गफार खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शाळेतील शिक्षिका श्रीमती जयश्री हाडके ,नबिला बाजी हूमेरा बाजी, तृप्ती भवर सर्वांनी विशेष परिश्रम घेतले होते .