काळे गट

आ. आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या ‘मराठी भाषा समितीच्या’ अध्यक्षपदी निवड

आ. आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या‘ अध्यक्षपदी निवड

आ. आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या‘ अध्यक्षपदी निवड

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २७ मार्च २०२५ :- आपल्या नेतृत्व गुणातून व अतुलनीय बुद्धी कौशल्यातून कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला आकार देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या ‘मराठी भाषा समितीच्या’ अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

महायुती शासनाने नुकतीच विधान मंडळाच्या विविध समित्या जाहीर करून या महत्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर केले असून यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या ‘मराठी भाषा समितीच्या’ अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. मराठी भाषा समिती महाराष्ट्र राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण अंग असून मराठी भाषेच्या विकासासाठी आणि त्या भाषेच्या योग्य वापरासाठी विविध शिफारसी करते. समितीचे काम केवळ सरकारी यंत्रणांमध्ये मराठीचा वापरास प्रोत्साहन देणे एवढाच मर्यादित नाही तर मराठी साहित्यातील वाड्मयीन योगदान, मराठी भाषा शिक्षण, तसेच साहित्य, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यावर देखील लक्ष केंद्रित करणे आहे.अशा महत्वाच्या ‘मराठी भाषा समितीच्या’ अध्यक्षपदावर केलेल्या निवडीबद्दल आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाचे आभार मानले आहे.

जाहिरात

आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देतांना आ. आशुतोष काळे यांनी सांगितले की, मराठी भाषा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठान आहे. या भाषेचा व्यापक वापर आणि संवर्धन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण, सरकारी कामकाज आणि समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये मराठीचा योग्य वापर करणारे एक मजबूत आणि सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाईल. लोकांची मराठी भाषेप्रती जागरूकता अधिक समृद्ध कशी होईल यासाठी प्रयत्न करू. मराठी भाषेची भूमिका राज्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनात अधिक मजबूत होईल व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक नवीन दिशा प्राप्त होईल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे