आपला जिल्हा

युवासेना – शिवसेना तर्फे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा- शहरप्रमुख गगन भैय्या हाडा 

युवासेना – शिवसेना तर्फे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा- शहरप्रमुख गगन भैय्या हाडा 
युवासेना – शिवसेना तर्फे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा- शहरप्रमुख गगन भैय्या हाडा 
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २६ मार्च २०२५अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सलग ६ व्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील सर्व २८८ विधानसभेत शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून कोपरगावात देखील या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  युवासेना शहरप्रमुख गगन भैय्या हाडा यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात
या पत्रकात हाडा यांनी म्हटले आहे की, या अनुषंगाने कोपरगाव शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवासेना – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शनिवार दि २९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.

जाहिरात

यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सदर सराव परीकक्षा कोपरगाव शहरातील मौनगिरी कोचिंग क्लासेस, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी, शगुन कलेक्शन समोर व शिंदे लासणकर क्लासेस, एच डी एफ सी बँक शेजारी खंदकनाला या केंद्रांवर ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. तरी या सराव परीक्षेस सहभागी होण्यासाठी www.yuvasenacet.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना शहरप्रमुख गगन भैय्या हाडा यांनी केले आहे.

जाहिरात
गगन हाडा

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे