आपला जिल्हा
बाळासाहेब थोरात यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नाही ही महाराष्ट्राची खंत – खासदार संजय राऊत
बाळासाहेब थोरात यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नाही ही महाराष्ट्राची खंत – खासदार संजय राऊत

संगमनेर विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२५-सहकार, ग्रामीण विकास ,दूध व्यवसाय, आर्थिक समृद्धी, कृषी, शिक्षण आणि निळवंडे धरणाचे पाणी देऊन या भागामध्ये समृद्धी निर्माण करण्याचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सतत जनतेसाठी काम करणाऱ्या या नेतृत्वाने तालुक्याला राज्यात एक नंबर बनवताना राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून त्यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नसणे ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खंत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.











