आपला जिल्हा

महसूली सेवा सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

महसूली सेवा सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

महसूल पंधरवड्यास सुरुवात

राहाता येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या उपक्रमांचे आयोजन

शिर्डी विजय कापसे दि. २ ऑगस्ट २०२४ (उमाका)- जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान महसूल पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात महसूल विभागाच्या सेवा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज येथे दिले.

जाहिरात

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सोपी व्हावी यासाठी महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट राबविला जाणार आहे. या पंधरवड्यात आयोजित करावयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील तयारीचा आढावा अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या.

जाहिरात

या पंधरवड्यास आज, १ ऑगस्ट पासून ‘महसूल दिन’ साजरा करून महसूल सप्ताहाचा प्रारंभ झाला. यानिमित्ताने राहाता तहसील येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चे अर्ज भरून घेणे व माहिती देणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

महसूल पंधरवड्यात २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, ४ ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, ५ ऑगस्ट रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, ६ ऑगस्ट रोजी शेती, पाऊस आणि दाखले उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेती, फळबागा, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेऊन विविध दाखले वाटप केले जातील. दि. ७ ऑगस्ट रोजी युवा संवाद उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण आणि रोजगाराच्या अनुषंगाने विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत महसूल विभागातील विविध प्रकरणे, अपील, सलोखा योजनेतील प्रकरणे, जमिनी विषयक खटले निकाली काढली जातील. दि. ९ ऑगस्ट रोजी ‘महसूल ई – प्रणाली’ उपक्रमातून ऑनलाईन प्रणालीच्या बाबतीत जनजागृती करून आपले सरकार या सरकारी संकेतस्थळावरील प्राप्त तक्रारींची दखल घेऊन निकाली काढल्या जातील. दि. १० ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमातून सैनिकांच्या बाबतीतील सर्व जमिनीची प्रकरणे, आणि दाखले वाटप केले जातील. दि.११ ऑगस्ट रोजी ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन’ करून जनजागृती केली जाईल. दि.१२ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा – दिव्यांगाच्या कल्याणाचा’ राज्याच्या वतीने दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रकारचे दाखले वाटप केले जातील. दि.१३ ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद आणि प्रशिक्षण शिबीर राबविले जाऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडविल्या जातील. दि.१५ ऑगस्ट रोजी संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद आणि उत्कृष्ट कामे केलेल्या कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ साजरा केला जाईल. सदर उपक्रमामुळे शासनबद्दल नागरिकांत विश्वास वाढीस लागून कामकाज अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास श्री.कोळेकर यांनी व्यक्त केला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे