आपला जिल्हा
समता योग भवनमध्ये दीपोत्सवाचा प्रकाशोत्सव; सप्तचक्रांच्या मांडणीतून योग आणि आरोग्याचा संदेश


Kopargaon vijay kapse दि ९ नोव्हेंबर २०२६ : दीपावलीच्या मंगलमय पहाटे प्रकाशाचा उत्सव आणि योगसाधनेचा आरोग्यदायी संदेश यांचा अनोखा संगम समता योग भवन येथे अनुभवायला मिळाला. समता योग मंदिराचे मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, योग प्रशिक्षक अभिजित शहा व सतीश गुजराथी यांच्या अभिनव संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव उत्साहपूर्ण आणि मांगल्यपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी मानवी शरीरातील सप्तचक्रांचे महत्त्व दिव्यांच्या आकर्षक मांडणीतून अधोरेखित करण्यात आले.









