आपला जिल्हा

दीपावलीनिमित्त संगमनेरचे रस्ते झाले चकाचक; नगरपरिषदेने घेतलेल्या नव्या स्वीपिंग मशीनने रस्त्यांची साफसफाई

दीपावलीनिमित्त संगमनेरचे रस्ते झाले चकाचक; नगरपरिषदेने घेतलेल्या नव्या स्वीपिंग मशीनने रस्त्यांची साफसफाई

मा.मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम

Sangmner vijay kapse दि ८ नोव्हेंबर २०२६-  मा.महसूल व कृषीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकसित आणि वैभवशाली ठरले आहे. संगमनेर शहरात येणाऱ्या चारही बाजूच्या रस्त्यांचे त्यांनी चौपदरीकरण व सुशोभीकरण केले आहे नव्याने नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात दाखल झालेल्या स्वीपिंग मशीनने शहरातील रस्त्यांची स्वच्छता केली असून दीपावलीच्या निमित्ताने सर्व रस्ते अत्यंत सुंदर आणि चकाचक झाले आहे.

जाहिरात

माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर नगर परिषदेने नव्याने अडीच कोटींचे स्वीपिंग मशीन, नगरपालिकेचे एक स्वीपिंग मशीन, दहा घंटागाडी, चार ट्रॅक्टर स्वच्छतेसाठी दाखल झाले आहेत. या लोकार्पणाच्या कार्यक्रमात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे व उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपरिषदेचे अधिकारी यांना सूचना केल्या होत्या त्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व रस्ते स्वच्छ करा.

जाहिरात

यानंतर आमदार सत्यजित तांबे व सभापती किशोर टोकसे व इतरांनी स्वतः उभे राहून साफसफाईची पाहणी केली. संगमनेर बस स्थानक हा हॅपी हायवे जो लक्ष्मी रोड नावाने ओळखला जातो तो अत्यंत सुंदर पद्धतीने स्वच्छ केला आहे. याचबरोबर विविध सहकारी संस्थांनी या रस्त्यावर डिव्हायडर मध्ये असलेल्या झाडांची छाटणी करून ते आकर्षक बनवले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना मागील चार वर्षापासून या झाडांना दररोज पाणी घालत आहे त्यामुळे ही झाडे फुलली आहेत. शहरांमध्ये येणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरण आणि विद्युतीकरण झाल्याने संगमनेरात येताना अत्यंत आनंददायी वातावरण वाटत आहे.

जाहिरात

धुळमुक्त शहराची संकल्पना राबवण्यासाठी नगर परिषदेने सातत्याने विविध उपक्रम राबवले असून स्वच्छतेमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग राहिला आहे. सार्वजनिक स्वच्छता, ओला कचरा, सुका कचरा यासाठी नगरपरिषदेकडून मोठे काम झाले असून आता रस्त्यांचे स्वच्छता अभियानामुळे दीपावलीच्या निमित्ताने शहरात येणारे रस्ते चकाचक व आनंददायी झाले आहेत.

फ्लेक्स संस्कृतीला फाटा

मागील दोन वर्षांपूर्वी संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये अवैध फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागले होते यामुळे व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत होते आणि शहराचे विद्रूपीकरण झाले होते. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून फ्लेक्स बंदी करण्यात आली असून दीपावलीच्या निमित्ताने शहरांमध्ये कुठेही फ्लेक्स नसल्याने नागरिक ही आनंदी आहेत. शहराचे सौंदर्य व सुशोभीकरण वाढवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचे असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे