शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात शिवसेना कायम तत्पर-खा. भाऊसाहेब वाकचौरे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून कोपरगाव तालुक्यात खा वाकचौरे व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ८ नोव्हेंबर २०२६– राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी ही भावना राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांची होती. शेतकरी व कष्टकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी दिला होता. शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये दिवाळीपूर्वीच सरकारने पाठवले व सामाजिक भावनेतून शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून गरजूंना महाराष्ट्रभर आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात शिवसेना कायम तत्पर असते असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
जाहिरात
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव येथे महात्मा गांधी प्रदर्शन हॉलमध्ये कोपरगाव तालुक्यातील ५०० गरजू लाभार्थी कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे ,शहर प्रमुख अक्षय जाधव, सनी गायकवाड सुनील साळुंखे, अनिल नरोडे, प्रसाद सारंगधर, वैभव चव्हाण ,अभिषेक आव्हाड, सनी काळे, वैभव कुराडे माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे आदींसह शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम करत आहे. दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी महिला कष्टकरी शेतकरी व समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वाचे काम केले आहे. आजही उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे असेही ते म्हणाले.जाहिरात
सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.