दीपावली हे आनंद, प्रकाश व बंधू भावाचे पर्व – माजी मंत्री बाळासाहेब थोरात; अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन
दीपावली हे आनंद, प्रकाश व बंधू भावाचे पर्व – माजी मंत्री बाळासाहेब थोरात; अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन
Sangmner vijay kapse दि ८ नोव्हेंबर २०२६संगमनेर तालुक्याचा विकास आणि प्रगती ही अनेक दिवसांच्या कष्टामधून आहे. यामध्ये मागील पिढ्यांचेही योगदान आहे. कष्ट प्रगती वाटचाल हे सातत्याने सुरू असले तरी दीपावली हा सर्वांच्या जीवनातील आनंदाचा कालखंड असतो. यावर्षी प्रदूषण विरहित दिवाळी हे वैशिष्ट्य असून दीपावली हे आनंद प्रकाश प्रेमभाव आणि बंधू भावाचे पर्व असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.जाहिरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, ॲड.माधवराव कानवडे, सौ.कांचनताई थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात, गणपतराव सांगळे, रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, हौशीराम सोनवणे, डॉ.हसमुख जैन, सुभाष सांगळे,संचालक विनोद हासे,,विजय राहणे,सतीश वर्पे,नवनाथ आरगडे,दिलीप नागरे, गुलाबराव देशमुख,अरुण वाकचौरे, चंद्रकांत कडलग,सुंदराबाई रावसाहेब दुबे, रामनाथ कुटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे,कृष्णा दिघे,अमोल दिघे यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अमृतवाहिनी बँक, राजहंस दूध संघ, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, जिल्हा सहकारी बँक यांचा विविध संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले.जाहिरात
यावेळी शुभेच्छा देताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दीपावली मध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीचे पूजन ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक जण वर्षभर धावपळ कष्ट करत असतो मात्र हा चार दिवसांचा कालखंड आनंदाचा असतो. दीपावली हे प्रकाश बंधुभाव आनंद व प्रेमाचे पर्व आहे. यावर्षी प्रदूषण विरहित दिवाळी होते आहे हे आनंददायी आहे.
संगमनेर तालुका हा कष्टातून उभा राहिला आहे कष्टाने लक्ष्मीची पावले पडतात. त्यातून समृद्धी निर्माण होते ते आपण जपले पाहिजे. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका या वाटचालीमध्ये जुन्या पिढीचे ही मोठे योगदान राहिले आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले. दुष्काळी भागात कारखाना सुरू झाला. त्यानंतर पाईपलाईनचे जाळे निर्माण झाले,ऊस वाढ झाली, वीज मोटारींचे कनेक्शन आले. शेतकऱ्यांच्या कष्टातून हे पुढे सर्व वाढत गेले.
जाहिरात
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले सुदैवाने यावर्षी धरण भरली आहे पण मात्र पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. हे वर्ष दुष्काळाचे आहे. अशा काळात चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. येणारे संकट मोठी आहे परंतु त्यातून सावरण्याची सर्वांना शक्ती परमेश्वर देवो ही प्रार्थना त्यांनी केली.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध सहकारी संस्थांनी शेतकरी, उत्पादक, कामगार या सर्वांना विविध देयके दिल्याने बाजारपेठ फुलली आहे. सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे शहराची बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर या आनंद पर्व काळामध्ये सर्वांनी प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करावी असे सांगताना जुन्या काळातील दिवाळीच्या आठवणी सांगितल्या.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर कारखाना सुरू असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकूल परिस्थितीतूनही कारखान्याने चांगले काम केले आहे. 9000 मे टन क्षमतेच्या विस्तारणीकरणाचे काम सुरू आहे. चालू हंगामात कारखान्याने 85 लाख युनिट वितरित केले याचबरोबर शेतकरी सभासद व कामगार यांना दीपावली निमित्त सुमारे 22 कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमोल दिघे यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भजन प्रभात मधून डॉ.जयश्री थोरात यांनी कबीरवाणीचा समतेचा मंत्र सांगितला.
प्रा.विनोद राऊत व सहकाऱ्यांच्या भजन प्रभात हा कार्यक्रम कारखाना लक्ष्मीपूजन निमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत तुकाराम, चोखामेळा यांच्यासह विविध संतांची गीते या समूहाने गायली. याचबरोबर संत कबीरांच्या गीतांनी समतेचा जागर निर्माण केला. संत कबीरांच्या विविध गीतांचा मानवतेचा व समतेचा विचारांचा कबीरवाणीचा अर्थ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सांगितला.