वसुबारस दुध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादकांना दिलासा; पहिल्याच वर्षी लिटरमागे ३ रुपये ५० पैसे रिबेट
दूध उत्पादक शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा; संस्थेचा शेतकरी हिताचा उपक्रम
Kopargaon vijay kapse दि ८ नोव्हेंबर २०२६ – कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री. चांगदेवराव गणपतराव औताडे पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या वसुबाबास अॅग्रो प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनीच्या दूध संकलन केंद्राने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पहिल्याच वर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३ रुपये ५० पैसे रिबेट वाटप केले . एकूण रिबेट २५ लाख ६६ हजार रूपये दुध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य देत संस्थेने दूध उत्पादक सभासदांसाठी १२ टक्के व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसायाला आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे ते म्हणाले.






