करंजी शाळेचा दिपक सोनवणे जिल्हास्तरीय गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम
करंजी शाळेचा दिपक सोनवणे जिल्हास्तरीय गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२६– जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने त्रिमूर्ती शिक्षण संस्था, नेवासा फाटा येथे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या जिल्हास्तरीय शालेय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजी बुद्रुक या शाळेचा इयत्ता ७ वीचा विद्यार्थी दिपक भाऊसाहेब सोनवणे याने गोळाफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत गावसह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जाहिरात
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या दिपकने ११.०९ मीटर अंतरावर गोळा फेकून मैदानावर उपस्थित सर्वांच्या नजरा खेचून घेतल्या. ग्रामीण भागात खेळाच्या आधुनिक साहित्याचा आणि सुविधांचा तसेच तज्ञ मार्गदर्शनाचा अभाव असतानाही, केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दिपकने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे.जाहिरात
दिपकच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल व त्याला मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे व शालेय शिक्षक संगीता सांबारे, स्तुती मिरजकर, बेबी कराळे, जयश्री मोगरे, हांडे सुमेश, जपे आदिनाथ, शेख सलीम, डॉ.चव्हाण ज्ञानोबा, धिंदळे बाळू, दवणे दीपक, तुंगार दीपक, नाना पानपाटील आदींचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ. आशुतोष काळे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणधिकारी शबाना शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, सरपंच रवींद्र आगवन,उपसरपंच शिवाजी जाधव, केंद्रप्रमुख संजय महानुभाव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, उपाध्यक्ष एकनाथ कापसे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गणेश फापाळे, उपाध्यक्ष प्रा. विजय कापसे, यांच्या सह पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.जाहिरात