आपला जिल्हा

कुकडी धरण समूहातून आवर्तन देण्याबाबत निश्चित विचार करू – ना. राधाकृष्ण विखे पाटील

कुकडी धरण समूहातून आवर्तन देण्याबाबत निश्चित विचार करू – ना. राधाकृष्ण विखे पाटील

कुकडी धरण समूहातून आवर्तन देण्याबाबत निश्चित विचार करू – ना. राधाकृष्ण विखे पाटील

जाहिरात

Jamkhed vijay kapse दि १ ऑक्टोबर २०२६ : टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाताना प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत संवेदनशीलपणे काम करावे. कोणताही नियम किंवा कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करू नका. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, जामखेड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू केली आहे. कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून देण्याबाबत निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जाहिरात

मंत्री विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीपिकांची पाहणी केली. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
कर्जत-जामखेड तालुक्यातील दुष्काळी भागातील विविध प्रश्न समजून घेण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. सुनील कर्जतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा सौ. प्रांजली चिंतामणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, महावितरणचे रमेश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, प्रांताधिकारी नितीन पाटील, विनायक देशमुख, अंबादास पिसाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगतीने निर्णय घेतले आहेत. पाण्याचे नियोजन करताना जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता याला प्राधान्य देण्यात यावे. तालुक्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या.
परिस्थिती गंभीर झाल्यास सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात यावेत. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करत टँकर नियोजनासाठी ग्रामसेवक व तलाठ्यांची उपस्थिती सक्तीची करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. परिस्थिती गंभीर असल्याने प्रत्येक विभागातील अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. बैठकीत चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेमध्ये रोष निर्माण होऊ देऊ नका; अन्यथा कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कवडगाव, चौंडी, जवळा परिसरातील कोल्हापूर बंधाऱ्यांची कामे, मोहरी तलावाचा सांडवा तसेच कुकडी कालव्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी दिली.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणाला खूश करण्यासाठी चुकीची माहिती देऊ नये. पीकविमा, वीजप्रश्न आणि जलजीवन मिशनच्या योजनांबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज आहे, असे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. यावेळी आ. सुनील कर्जतकर यांनीही विविध सूचना मांडल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे