पिंपळगाव माथा येथील जळीत झालेल्या आदिवासी कुटुंबाला यशोधन कार्यालयाची मदत

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीने मेंगाळ कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य

पिंपळगाव माता येथील भरमखासवाडी येथील सावळेराम रामकृष्ण मेंगाळ यांना यशोधन कार्यालयातील आदिवासी विभाग प्रमुख बाळकृष्ण गांडाळ यांच्या हस्ते साहित्य देण्यात आले. यावेळी उपसरपंच सुखदेव लहांगे, सोपान भाऊ पांडे, बाळू शिंदे ,राजवर्धन पिसाळ, आनंदा मेंगाळ, सावळीराम मेंगाळ ,रंजना मेंगाळ, अनिकेत मेंगाळ, भास्कर मेंगाळ आदी उपस्थित होते.

शिवरात्रीच्या दिवशी भर दुपारी बेंगाळ कुटुंबीयांच्या आदिवासी वस्तीतील घराला आग लागली या आगीमध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. हे कुटुंब उघड्यावर आले. ही बातमी कळताच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचना यशोधन कार्यालयातील यंत्रणेला दिल्या त्यानंतर यशोधन च्या वतीने गृह उपयोगी साहित्य किराणा या कुटुंबीयांना देण्यात आली.

यावेळी बोलताना बाळकृष्ण गांडाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे. तालुक्यातील गोरगरिबांच्या सुखदुःखात त्यांनी कायम सहभाग घेतला आहे ज्या ज्या वेळेस गरीब माणसाला अडचण आली त्यावेळेस ते पाठीशी उभे राहिले आहेत. आदिवासी बांधवांना त्यांचा मोठा आधार आहे. यशोधन कार्यालय ही मदतीसाठी कायम तत्पर असल्याचे ते म्हणाले
तर सावळेराम मेंगाळ म्हणाले की आमच्या पाठीशी कायम उभे राहणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे गरिबांचे नेते आहेत. माझ्या घरावर आलेल्या संकटाच्या वेळी त्यांनी तातडीने मदत देऊन आम्हाला मदत केली त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे ऋणी असल्याचे ते म्हणाले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यशोधन कार्यालया प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



