आपला जिल्हा
साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
साई शक्ती इंग्लिश मिडीयम मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६– महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल कासली मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर भाषण दिली तर सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ तसेच स्वराज्यातील मावळ्यांची वेशभूषा करत वेगवेगळे कार्यक्रम सादर करत शिवरायांचा जीवनपट समोर मांडला.






