आपला जिल्हा

डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त- सरपंच सखाराम सरक

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि ४ मार्च २०२६डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालय विळदघाट आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २२ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नांदगाव ता. जि. अहिल्यानगर येथे संपन्न झाले. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी प्रास्ताविकात सात दिवस राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

जाहिरात

या शिबिरात शाश्वत विकासासाठी युवक- जलसंधारण, पडीक जमीन व्यवस्थापनावर विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यामध्ये जलसंधारण अभियान, वृक्ष संवर्धन, ग्रामस्वच्छता, डिजिटल साक्षरता अभियान, शेती विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती, रस्ते दुरुस्ती, नव मतदार जनजागृती इत्यादी उपक्रम राबवण्यात आले.

जाहिरात

यावेळी अध्यक्षीय भाषणात सखाराम सरक यांनी स्वयंशिस्त, कष्टाची तयारी व परिस्थिती जाणीव हे त्रीसूत्री तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी श्रमसंस्कार शिबिर उपयुक्त असल्याचे व स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक नांदगाव चे लोकनियुक्त सरपंच यांनी केले.

जाहिरात

या शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. दौलतराव नलावडे, प्रा. डॉ. विवेक निकम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. जयश्री राऊत, डॉ. दीपिका मावळे, नांदगाव सोसायटीचे मा. चेअरमन तथा विद्यमान संचालक श्री. राजाराम पुंड, ग्रामपंचायत सदस्य नाथाभाऊ सरक, श्री.बाळू वर्पे, सौ.स्वातीताई वैभव आघाव, उद्योजक दत्तात्रय पुंड, श्री. विलास सोनवणे, डॉ. सतिश सोनवणे, ह.भ.प. संकपाळ महाराज, श्री.आबा पुंड आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. विलास सोनवणे उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांनी पाणलोट क्षेत्र विकास व पडीक जमीन व्यवस्थापन या विषयाचे महत्त्व अधोरोकीत केले. तसेच श्री.बाळू वर्पे ग्रामपंचायत सदस्य यांनी म्हटले स्वयंसेवकांनी आपल्या उज्वल भविष्याच्या वाटचालीत समाज व राष्ट्राचे देणे लागते ही जाणीव कायम ठेवावी, फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून जरी सेवा केली तरी समाजासाठी अत्यंत मोलाची ठरते. ग्रामीण भागातील जीवनशैली आदर्शवंत आहे याचा जवळून अनुभव घेण्याची सुवर्णसंधी स्वयंसेविकांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून मिळाली कृषीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात वर्चस्व गाजवतात यामुळेच असे प्रतिपादन प्रा. जयश्री राऊत यांनी केले. प्रा. डॉ. दीपिका मावळे यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री राजाराम पुंड मा.सरपंच यावेळी बोलताना म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना केवळ एक सामाजिक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना जीवनमूल्याची जाणीव करून देणारे प्रभावी व्यासपीठ असून या शिबिरामुळे सामाजिक बांधिलकी दुढ होते.

या शिबिरासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे संचालक (तंत्र) श्री. सुनील कल्हापुरे तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमांमध्ये स्वयंसेविका नम्रता पोपळघाट व तृप्ती भापकर यांनी आपले सात दिवसातील आलेल्या अनुभव कवितेतून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अनुष्का तुपे तर आभार श्रावणी ताडे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे