माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे योगदान सदैव अविस्मरणीय – ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे योगदान सदैव अविस्मरणीय – ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १७ मार्च २०२६-सहकारमहर्षी स्व.कोल्हे साहेबांची क्षमता मोठी होती; ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती. सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची ताकद त्यांच्या नीतिमत्तेत होती. माझा शेतकरी जगला पाहिजे, हाच विचार त्यांनी मनात ठेवून आंदोलन उभं केलं. त्यावेळी सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा गौण मानून त्यांनी कधीही ओशाळपणा दाखवला नाही, असा मनोदय धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केला.
जाहिरात
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट, कोपरगाव यांच्या वतीने भव्य कीर्तन सेवेचे आयोजन सोमवार, दिनांक 16 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते. यावेळी धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा पार पडली. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी सिंधूताई (माई)कोल्हे, नितीनदादा कोल्हे,बिपीनदादा कोल्हे,मा. आ. स्नेहलताताई कोल्हे, अमितदादा कोल्हे,युवानेते विवेकभैय्या कोल्हे, सुमितदादा कोल्हे, ईशानभैय्या कोल्हे, सौ. रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कर्तुत्ववान नेतृत्वाचे कौतुक करताना, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना शेवाळे महाराज म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेबांच्या शब्दाला जिकडे जाईल तिकडे किंमत होती. ज्याचं त्याला दान द्यायचं देऊन ते देवाघरी निघून गेले. स्व. कोल्हे साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय दिला, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्वार खुले केले. आणि एवढंच नाही, तर 1988 ला किल्ले रायगडावर वीज पडून छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीचे नुकसान झाले. त्यावेळी साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेऊन संजीवनी सहकारी साखर कारखान्यातून वेगळी तरतूद करून रायगडावरील ती मेघडंबरी बांधून देऊन आदर्श घालून दिला.जाहिरात
वाऱ्यालाही धक्का लागू नये आणि मुंगी मरू नये अशा पद्धतीने इतकं सुंदर आयुष्य आणि जीवन त्यांनी जगलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यात व कोपरगाव तालुक्यात स्वर्गीय कोल्हे साहेबांबद्दल नितांत आदर व्यक्त केला जातो. वात्सल्याची भावना, लोकलोभ आणि लोकसेवा या गुणांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांना एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचवलं. दरवर्षी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त असा दुग्धशर्करा योग जुळून येतो. जगावर प्रेम करण्यासाठी कोल्हे परिवाराचा पुढाकार असतो, त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा लागेल.
खरंतर स्वर्गीय कोल्हे साहेबांचं स्मरण केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळेल, असं त्यांचं भव्य व्यक्तिमत्व होतं. पुण्यस्मरण कुणाचे होत नाही; ज्याचा स्मरण केल्यावर पुण्य मिळतं त्यांचंच पुण्यस्मरण केलं जातं. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या मनात आलं असतं तर ते परदेशातही स्थायिक झाले असते, मात्र परदेशातून कोपरगावकडे आले नसते तर कदाचित महाराष्ट्रासह कोपरगावचं मोठं नुकसान झालं असतं. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या रूपात असलेला कर्मयोगी एवढा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. 1989 च्या काळामध्ये कुणालाही माहीत नव्हते, परंतु या काळात त्यांनी कोपरगाव तालुक्याला शिक्षण हब केलं. यामुळे गरिबांची लेकरं शिकत राहिली. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन अनुभवलेलं आहे.
स्वर्गीय कोल्हे साहेबांनी बांधलेला डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात, ही चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे. यानंतर त्यांनी साखर कारखाना उभारला. सलग सहा वेळा आमदारकी भूषवली. एकदा आमदार होणं अवघड असतं, परंतु मन जिंकलं तर मतं जिंकण्याची गरज पडत नाही. मन जिंकलं तर मतं आपोआप पडत असतात. परमपूज्य स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी लोकांची मनं जिंकली होती. ते एवढे विद्वान होते की स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते नावाने परिचित होते.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी थेट सहकार मंत्री व गृहराज्यमंत्री अमितभाई शहा यांना कोपरगावात आणले आणि त्यांच्या मुखातून विवेकभैय्यांचे कौतुकही झाले. स्वर्गीय कोल्हे साहेबांची तीच बौद्धिक क्षमता कोल्हे कुटुंबीय पुढे घेऊन जात आहेत.
आयुष्यामध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जे जीवन जगलं, कारखाने, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, आंदोलनांमध्ये सहभागी झाले, शेतकऱ्यांना न्याय दिला; या सर्व कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फायदा झाला. गोदावरी नदीमध्ये मीटर टाकणारे स्वर्गीय कोल्हे साहेब पहिले होते. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मीटर फेकून दिले. साहेबांची क्षमता मोठी होती; ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती.
परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज,परमपूज्य परमानंदजी महाराज, महंत सरलादीदी, ह.भ.प.संतोषमहाराज जाधव,श्री श्री १०८ परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज,महामंडलेश्वर काशीकानंदगिरीजी महाराज अनंतराज महाराज महानुभव, चांगदेव महाराज, विकासगिरीजी महाराज, ह. भ. प. सोमनाथ महाराज मोरे, दामोदरबाबा महाराज, ह. भ. प. जयवंत महाराज खेडकर, ह. भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे, गोविंद महाराज,ह. भ. प. दादा महाराज टुपके, अनंतराज महाराज महानुभव, गोविंद महाराज महानुभव, गायनाचार्य ह.भ.प. निळोबा महाराज, गायनाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज, मृदुंगाचार्य ह.भ.प. संतोष महाराज, ह.भ.प. संतोष महाराज दीक्षित तसेच राहता पिंपळस येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, सर्व विद्यार्थी टाळकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.