आपला जिल्हा

संजीवनीची एकलव्य आदिवासी आश्रमशाळा राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेसाठी पात्र

संजीवनीची एकलव्य आदिवासी आश्रमशाळा राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेसाठी पात्र


  ग्रामीण भागातून तंत्रज्ञान क्षेत्रात संजीवनीची दमदार झेप

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० मार्च २०२६  संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचालित टाकळी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत राजूर (ता. अकोले ) प्रकल्प स्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामुळे ग्रामीण व आदिवासी  विद्यार्थ्यांची  गुणवत्ता आणि क्षमता पुन्हा एकदा संजीवनीच्या प्रयत्नांमुळे अधोरेखित झाली आहे.

जाहिरात

  लीडरशिप फॉर इक्विटी आणि आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर (ता. अकोले) यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथील रिसॉर्टमध्ये आयोजित एक दिवसीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत विविध आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवला होता.
  या स्पर्धेचा मुख्य उद्देश चौथी  ते आठवीतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी विकसित करणे, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे, संवाद कौशल्य, तर्कशक्ती आणि स्क्रॅच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ब्लॉक-बेस्ड कोडिंग कौशल्यांचा विकास करणे हा होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित असलेल्या २१ व्या शतकातील कौशल्यांशी सुसंगत असा हा उपक्रम ठरला.

जाहिरात

    या स्पर्धेत शाळेच्या संघात श्रद्धा रामदास पवार, ओंकार संतोष  पवार आणि रोहित भाऊसाहेब पवार (इ ८ वी) या विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. यासोबतच कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेचे शिक्षक श्री. धनेश मधुकर गायकवाड आणि मुख्याध्यापिका श्रीमती मीरा जोशी यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले.

जाहिरात

      विद्यार्थ्यांचा  सत्कार करताना विश्वस्त श्री. सुमित कोल्हे यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील विध्यार्थ्यांसाठी  गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दारे खुली व्हावीत आणि त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळावे , या दूरदृष्टीतून संस्था सातत्याने कार्यरत आहे. संजीवनीची ही कामगिरी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी  प्रेरणादायी ठरत असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या संधींची दारे उघडणारी आहे.
        या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे तसेच नॉन-अकॅडमिक डायरेक्टर  डी. एन. सांगळे यांनी विद्यार्थ्यांचे  व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी एकलव्य आदीवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबध्दल सत्कार केला. यावेळी श्री डी. एन. सांगळे, प्राचार्या मीरा जोशी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे