आपला जिल्हा

संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


     
सांस्कृतिक सादरीकरणातुन छत्रपती शिवरायांच्या शौर्याला  अभिवादन

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ९ फेब्रुवारी २०२६: संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक  स्नेहसंमेलनात ‘शिवगर्जना-स्वराज्याची पुकार’ या भव्य व प्रेरणादायी संकल्पनेवर आधारीत सांस्कृतिक सादरीकरणातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन साजरे झालेल्या संमेलनाने स्वराज्याच्या प्रेरणेतुन राष्ट्रघडणी कडे वाटचाल असा संदेश  देण्यात आला.

जाहिरात

        या कार्यक्रमास संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, कलावतीताई नितिनदादा कोल्हे व पुनम दिपक विसपुते, संचालिका डॉ. मनाली कोल्हे, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंन्स डॉ. आर. एस. शेंडगे   हे विशेष  अतिथी म्हणुन उपस्थित होते. त्यांनी चिमुरड्यांच्या आत्मविश्वासपुर्ण संवाद फेक, प्रभावी अभिनय, तालबध्द नृत्य आणि, हावभावपूर्ण चेहरे इत्यादी बाबींचे कौतुक केले.

जाहिरात

      या कार्यक्रमातुन बाल कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा प्रेरणादायी प्रवास रंगमंचावर जीवंत केला. मुघलांनी उध्वस्त केलेले पुणे, जिजाऊ मांसाहेबाचे पुण्यातील आगमन, छत्रपती शिवाजी  महाराजांचा जन्म, बालपन व जिजाऊंनी दिलेले संस्कार, गणपती मंदीराची स्थापना, अफजलखानाचा वध तसेच स्वराज्य उभारणील ऐतिहासिक टप्पे, संत तुकाराम भेट, आग्य्राहुन सुटका,शिवराज्याभिषेक, तानाजी मालुसरेंचा पराक्रम आणि महाराजांचा विद्यार्थ्यांना सदेश , इत्यादी नाट्य , गीते व नृत्याच्या माध्यमातुन प्रभावीपणे सादर केले.

जाहिरात

 

    भारतीय इतिहासाच्या सुवर्ण पानांवर ज्यांचे नाव अजरामर झालेले आहे व ज्यांनी स्वराज्य, स्वाभिमान व स्वधर्मासाठी आयुष्य  समर्पित केले अशा  महापुरुषाला  सपूर्ण भारत छत्रपती शिवाजी  महाराज म्हणुन आदराने वंदन करतो. शिवगर्जना ही संकल्पना निवडण्यामागचा उद्धेश  म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाचे महत्व, राष्ट्रभक्ती , शौर्य, नेतृत्वगुण आणि संस्काराचे बीजे रोवणे. शिवाजी महाराज हे फक्त महान योध्दा नव्हते तर कर्तृत्व, परीश्रम, दुरदृष्टी  आणि लोक कल्याणाचे प्रतिक होते. महाराजांचे योगदान प्रत्येक विद्यार्थ्याने जानले पाहीजे आणि त्यांच्या गुणांचा अंगिकार केला पाहीजे, हाच या संकल्पनेचा आत्मा आहे. अशा  बाबी विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे कडून सातत्याने पाठबळ मिळत असते. –डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स.    

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या अनुश्रिता सिंह, हेडमिस्ट्रेस अपर्णा फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या समन्वयिका स्वप्नाली वालझडे यांनी विशेष  परीश्रम घेतले.

संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाने आयोजीत केलेल्या स्नेहसंमेलनात सौ. कलावतीताई कोल्हे, सौ.पुणम विसपुते, डॉ. मनाली कोल्हे सांचे समवेत बाल कलाकार.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे