श्री गुरुदत्त च्या प्रयत्नातून ग्रामीण भागात दिले जाणार AI चे धडे

श्री गुरुदत्त च्या प्रयत्नातून ग्रामीण भागात दिले जाणार AI चे धडे
श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न

Kopargaon vijay kapse दि ६ एप्रिल २०२६- कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारी श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आर जे एस ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट चे चेअरमन चांगदेव कातकडे, संस्थेचे संस्थापक केशवराव भवर , डायरेक्टर स्वप्नील भवर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या हस्ते श्री गुरुदत्त ज्युनिअर कॉलेज (सायन्स) या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना पराग संधान यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नाचे कौतुक केले. संस्थेचा वार्षिक आढावा सांगत असताना डायरेक्टर स्वप्नील भवर यांनी नवीन इमारतीमध्ये विज्ञान प्रयोगशाळेबरोबरच तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून अद्यावत अशी तालुक्यातील प्रथम AI प्रयोगशाळा चालू करण्याचा मानस लवकरच पुर्ण करणार असल्याचे सांगितले.

तसेच ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना १२ वी सायन्स तसेच JEE व NEET सारख्या परीक्षेची तयारी आपणच करून घेणार असल्याने या परीक्षेच्या तयारीसाठी शहराकडे जाण्याची गरज राहणार नाही असे सांगितले.यामुळे शिरसगाव व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल.यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.सुरुवातीला गणेश वंदना करून सांस्कृतीक कार्यक्रम सुरू झाला यानंतर केजीच्या बालकांची नृत्ये मनमोहक ठरली.

मराठी , खानदेशी,हिंदी, तमिळ भाषांतील विविध गाण्यावर नृत्य करत सर्वांनी लक्ष वेधून घेतले. धर्मवीर संभाजी महाराज जीवनपट व शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी गाण्यावर करण्यात मर्दानी खेळ हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.शेवटी वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी मेहनत घेतली. तसेच या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपळे सर व श्रीमती पैठणकर मॅडम यांनी केले.




