आपला जिल्हा

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे धमाकेदार सादरीकरण

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे धमाकेदार सादरीकरण

विविध कलाविष्कारांनी साकारला तंत्रनिकेतनचा जल्लोष 2026

महाविद्यालयीन जीवन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा – मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २६ मार्च २०२६- छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा, दक्षिणात्य कथ्थक नृत्य, विविध फ्युजन सॉंग,महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारे नृत्य अशा विविध कलाविष्कारांनी अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा जल्लोष 2026 हा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने झाला असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत धमाकेदार सादरीकरण केले. तर महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात,  प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ, उपप्राचार्य प्रा.जी.बी.काळे, समन्वयक व विभाग प्रमुख प्रा.मिलिंद इंगोले, प्रा.नवनाथ शिंदे,प्रा.नीलिमा चौधरी, प्रा.जे.के.सातपुते, प्रा.मनीष सातपुते, प्रा.एस.व्ही.गायकवाड, प्रा.अशोक वाळे, प्रा.अक्षय वर्पे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

अमृतवाहिनीच्या अँपी थिएटर मध्ये जल्लोष 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक गणेश वंदनाने झाली. यानंतर हिंदी मराठी गीतांवरील विविध सामूहिक नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा ने सर्वांच्या अंगावर शहर आणले. तर दक्षिणात्य कथ्थक नृत्याने उपस्थांच्या डोळ्याची पारने फेडली. यामधील मुलांचा व मुलींचा सहभाग, मधून मधून होणारा टाळ्यांचा गजर, उत्कृष्ट संयोजन नियोजन आणि शिस्तबद्ध झालेला कार्यक्रम हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. यावेळी अमृतवाहिनी संस्थेतील विद्यार्थ्यांनी गायलेले लिहिलेले व संगीतबद्ध केलेले अमृतवाहिनी शिक्षण संस्थेवरील गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.

जाहिरात

यावेळी शुभेच्छा देताना मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाविद्यालयीन कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अभ्यास संशोधन महत्त्वाचे आहेत पण परिपूर्ण जीवनासाठी कला व सांस्कृतिक छंदही जोपासले पाहिजे. अमृतवाहिनी संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशात चांगल्या पदावर काम करत असून हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. संधी मिळाली तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुढे जात आहेत. चांगला अभ्यास करा यशस्वी व्हा हा कालखंड प्रत्येकाच्या जीवनात कायम स्वरणात राहणारा असून जीवनाला दिशा देणारा असल्याचे ते म्हणाले.

तर प्राचार्य  व्हि.बी.धुमाळ म्हणाले की, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याबरोबर विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून सातत्याने काम केले जात आहे. अमृतवाहिनीच्या अनेक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमधून मोठी मागणी असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्यासाठी विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सक्रिय सहभाग आणि उपस्थिती लक्षणीय होती.

संशोधनावर आधारित प्रोजेक्ट स्पर्धेला मोठा प्रतिसाद

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये अमृत फेस्ट ही टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न झाली यामध्ये छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे उत्तर महाराष्ट्र या विविध जिल्ह्यांमधून 226 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नवनवीन संशोधन पर प्रोजेक्ट यामध्ये दाखल झाले असून यातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळेल असे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे