आपला जिल्हा

संजीवनी यंनिव्हर्सिटी व एर्डोस रिसर्च यांच्यातील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

संजीवनी यंनिव्हर्सिटी व एर्डोस रिसर्च यांच्यातील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या


                ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ञ प्राद्यापकांनी एर्डोस रिसर्च स्थापन केलेली संस्था

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २८ मार्च २०२६- कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रातील नवे संशोधन व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने आज ऑक्सफर्ड विद्यापिठातील तज्ञ प्राद्यापकांनी स्थापन केलेल्या एर्डोस रिसर्च संस्थे सोबत परस्पर सामंजस्य करार (एमओयु) केला. एर्डोस संशोधन संस्थेचे संशोधक  व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राद्यापक प्रा.अजित जावकर आणि संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी या करारावर आज स्वाक्षऱ्या  केल्या. या करारामुळे संजीवनी विद्यापीठाने जागतीक पातळीवर एआय (कृत्रिम बुध्दिमत्ता) क्षेत्रात महत्वाचे पाऊल टाकले आहे. या एमओयु अंतर्गत संजीवनीमध्ये  एआय असिस्टंट रिसर्च सेंटर स्थापण होणार आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठाला हेच अपेक्षीत आहे, अशी प्रतिक्रीया प्रा.जावकर यांनी व्यक्त केली. उपस्थितीत प्राध्यापक व संशोधकांनी टाळ्यांच्या  गजरात या कराराचे स्वागत केले. संजीवनी विद्यापीठाच्या दृष्टीने आजचा दिवस एआय तंत्रज्ञाना सोबत वाटचाल करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल. अशी प्रतिक्रीया संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष   नितीनदादा कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

जाहिरात

    विद्यापीठाच्या सभागृहात हा परस्पर सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, स्ट्रटेजिक अॅडव्हायझर डॉ. शांतम शुक्ला, संजीवनी शैक्षणिक  संकुलातील विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य, डीन आणि विविध  विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

    यावेळी बोलताना प्रा.जावकर म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्तेचा  (एआय) वापर जगभर प्रत्येक क्षेत्रात वाढला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मुळ उध्देश संशोधनाच्या माध्यमातुन दैनंदिन अडचणी सोडविणे हा आहे. संशोधनात्मक वातावरण संजीवनी युनिव्हर्सिटी मध्ये तयार व्हावे यासाठी हा करार महत्वाचा ठरेल. एर्डोस रिसर्च संस्था ही ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ञ प्राध्यापकांची आहे.  एआय संदर्भातील विद्यार्थ्यांना स्किल सेट देण्याच्या उद्देशाने तीची स्थापना केली आहे.

जाहिरात

    श्री अमित कोल्हे म्हणाले, संजीवनी युनिव्हर्सिटी ही रिसर्च ड्रिव्हन (संशोधन  आधारीत) युनिव्हर्सिटी व्हावी, अशी संस्थेचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांची संकल्पना, आजच्या करारामुळे साकार होईल. संजीवनी शैक्षणीक संकुलाचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे म्हणाले, संजीवनी विद्यापीठात या करारामुळे नवा अध्याय सुरू झाला. आजचा दिवस संस्मरणीय ठरणार आहे. संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी यांनी सुत्रसंचालन केले तर स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड  टेक्नॉलॉजीच्या डीन डॉ. कविथा राणी यांनी आभार मानले.

सामंजस्य करारामुळे संजीवनी विद्यापिठातील पाच प्राध्यापक आणि अठरा विद्यार्थ्यांना  ऑक्सफर्ड विद्यापीठातील  एर्डोस रिसर्च संस्थेत तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळेल. रिसर्च प्रोजेक्ट तयार करता येतील. ऑक्सफर्डला जाण्याची संधी मिळेल.-प्रा.अजित जावकर ( एर्डोस रिसर्च संस्था)
—————————
भारतात सुमारे १२०० विद्यापीठे आहेत. मात्र संजीवनी सारख्या ग्रामीण भागातील विद्यापीठाला एर्डोस रिसर्च संस्थेने सामंजस्य करार करण्याची संधी दिली. ही फार मोठी उपलब्धी आहे. यामुळे संजीवनी विद्यापीठ जागतिक पातळीवर पोहचले आहे. या करारामुळे एआय तंत्रज्ञानाचे कौशल्य आणि नवे संशोधन आत्मसात करण्याची संधी  ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळेल.- अमित कोल्हे ( प्रेसिडेंट, संजीवनी युनीव्हर्सिटी)  

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे